शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिंगोलीत वसमतजवळ बस पेटविली; तर शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक 

By विजय पाटील | Updated: February 16, 2024 15:40 IST

प्रवाशांना खाली उतरवत एसटी बस पेट्रोल टाकून पेटवून दिली.

हिंगोली:  वसमत शहरापासून जवळ असलेल्या परभणी मार्गावरील खांडेगाव पाटीवर शुक्रवारी वसमत येथून परभणी येथे प्रवासी घेऊन निघालेली बस अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळली. यावेळी बसला लागलेल्या आगीत एस.टी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील सेनगाव, वसमत, कळमनुरी, औंढा आदी ठिकाणी १६ फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

वसमत ते परभणी मार्गावर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२: ३० वाजेदरम्यान वसमत आगाराची बस (क्र. एमएच १३ सीयू ८४२३) ही परभणीकडे प्रवासी घेऊन जात असताना खांडेगाव पाटीवर अज्ञातांनी बस आडविली. त्यातील प्रवाशांना खाली उतरवत एसटी बस पेट्रोल टाकून पेटवून दिली. बसला लागलेल्या आगीत बस जवळपास पूर्णतः जळली असल्याने मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना कळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, अजय पंडित, संजय गोरे, अंबादास विभुते, लोखंडे, अविनाश राठोड आदींनी भेट देऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

शिरड शहापूर येथे एसटी बसवर दगडफेक औंढा ते वसमत राज्य रस्त्यावरील शिरड शहापूर येथील रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन सकाळी ११ वाजेदरम्यान करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वसमत आगाराची वसमत ते औंढा बस (क्रमांक एमएच ४० एन ८४५७) आली असता अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. यावेळी बसच्या सर्व काचा फोडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सदरील बस पेट्रोलपंपावर नेऊन सुरक्षित ठिकाणी उभी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली