बसगाडी चक्क बनतेय ढकलगाडी
By Admin | Updated: December 22, 2014 15:06 IST2014-12-22T15:06:25+5:302014-12-22T15:06:25+5:30
जुनाट व मोडकळीस आलेल्या बसगाड्यांत होत असलेल्या नेहमीच्या बिघाडांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष करीत सुरू असलेला राज्य परिवहन मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

बसगाडी चक्क बनतेय ढकलगाडी
गोरेगाव : /ग्रामीण /मार्गावर पाठविण्यात येणार्या जुनाट व मोडकळीस आलेल्या बसगाड्यांत होत असलेल्या नेहमीच्या बिघाडांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष करीत सुरू असलेला राज्य परिवहन मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव हे परिसरातील ५२ खेड्यांची बाजारपेठ संबोधल्या जात असून व्यवहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. जिल्हा, तालुक्याला व वाशिम, रिसोड आदी ठिकाणी जाण्यासाठी दळण वळणाच्या दृष्टीने परिसरातील गावासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. असे असताना गावच्या दळणवळण सुविधेकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे.
गोरेगाव मार्गावर हिंगोली आगाराच्या मोजक्याच बसफेर्या सुरू असून तालुक्यासाठी एकही बसफेरी नाही. विदर्भात जाण्यासाठीची पूर्ण भिस्त वाशिम-रिसोड आगाराच्या बस फेर्यांवर आहे. आधीच बसफेर्या कमी आणि त्यात पाठविण्यात येत असलेल्या बसगाड्या जुन्या व मोडकळीस आल्यामुळे वाहतूक सेवेचा बोजवारा उडत आहे.
जुनाट मोडकळीस आलेल्या बसगाड्यांमध्ये सतत होत असलेल्या बिघाडांमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. अन्यथा खाजगी वाहनातून जिकिरीचा प्रवास करावा लागत आहे. संबधित या बाबीकडे दुर्लक्ष करीत परिवहन मंडळाच्या या कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. /(वार्ताहर)