शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:06 IST

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञे व श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला चोरट्यांचा माग काही सापडला नाही

- इस्माईल जहागीरदारवसमत : शहरातील श्रीनगर भागात आज दुपारी १२. ३० ते ३ वाजेच्या सुमारास भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी शर्मा यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत २ तोळे सोन्याचे दागिने व नगदी दहा हजार रुपये असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

आधारवरील माहिती अपडेट करण्यासाठी व स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेण्यासाठी शहरातील श्रीनगर भागात राहणाऱ्या शर्मा या महिला आज दुपारी १२: ३० वाजेदरम्यान घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूूप तोडत आत प्रवेश करत कपाटातील २ तोळे सोन्याचे दागिने व नगदी १० हजार रुपये लंपास केले. दरम्यान, शर्मा घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर, इम्रान कादरी, अजय पंडित, गजानन भोपे यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

ठसे तज्ज्ञांना केले पाचारण...घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञे व श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला चोरट्यांचा माग काही सापडला नाही, असे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा शोध घेऊ लागले आहे. 

दोन महिन्यांत ही दुसरी घटना...दोन महिन्यांपूर्वी अशीच भर दिवसा चोरीची घटना घडली. यानंतर पुन्हा ७ ऑगस्ट रोजी भर दिवसाच चोरीची घटना घडली आहे. पोलिस रात्री गस्त घालू लागले आहेत. परंतु चोरटे हे दिवसा चोरी करुन मोकळे होत आहेत. चोरीच्या घटना दिवसा होऊ लागल्यामुळे पोलिसांनी दिवसाही शहरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी