'बीएसएनएल'ची सेवा ४ दिवसांपासून विस्कळीत
By Admin | Updated: February 12, 2015 13:54 IST2015-02-12T13:54:53+5:302015-02-12T13:54:53+5:30
शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

'बीएसएनएल'ची सेवा ४ दिवसांपासून विस्कळीत
हिंगोली : /शहरात /चार दिवसांपासून भरोशाच्या बीएसएनएन सेवेने ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे. खंडित सेवेमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तरीही दीड ते दोन तासांत सेवा सुरळीत केली जाणार असल्याचे सांगून कर्मचारी वेळ मारुन नेत आहेत.
बीएसएनएल ग्राहकांसाठी विविध योजना देत असल्याने ग्राहकांची पसंती आहे. त्यामुळे जिल्हाभरात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. शिवाय, शासकीय, निमशासकीय कार्यालयातही बीएसएनएलच वापरले जाते. मात्र चार दिवसांपासून बीएसएनएल डोकेदुखी बनली आहे. कर्मचार्यांना विस्कळीत झालेल्या सेवेबद्दल विचारणा केली तर प्रत्येक ग्राहकांना वेग- वेगळी उत्तरे दिली जात आहेत. बहुतांश अधिकार्यांचे फोन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी पंचायत होत आहे. शिवाय, बँकांतील कामकाजही ठप्प झाले आहेत. तसेच शासकीय कार्यालयातील कामेही रेंगाळत चालली आहे. इतर सेवा उपलब्ध आहेत; परंतु बीएसएनएल कंपनीवरील विश्वास धूसर होत आहे. ऐनवेळी धोका देत असल्याने ग्राहकांची दिवसेंदिवस नाराजी वाढत आहे. मागील महिन्यातही या सेवा खोळंबाली होती. मोबाईल व इंटरनेट सेवा बंद पडल्याने मोबाईल खेळणेच बनले आहेत. नेटकॅफेही बंद पडल्याने अनेकांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे. /(प्रतिनिधी)