शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हात; कयाधू नदीपात्रात सापडले बेपत्ता मुलांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 14:53 IST

शेवाळा येथील घटना; खेळताना पाय घसरून पडल्याचा अंदाज

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शेवाळा येथील दोन बालके खेळताना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. दिवसभर शोधूनही ते सापडले नाहीत. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शेवाळा येथील कयाधू नदीच्या पात्रात त्या दोघांचे मृतदेह सापडले. चिमुकल्यांचे मृतदेह सापडताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळा येथील साधारणतः तीन ते साडेतीन वर्षे वयाची दोन बालके २० ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून बेपत्ता असल्याची खबर मिळाली. स्वराज दीपक सूर्यवंशी आणि शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोघेजण सकाळी गावातील मंदिराच्या शेजारी नेहमीप्रमाणे खेळत होते. परंतु सकाळी ११ वाजल्यानंतर ते दोघे दिसेनासे झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण ते सापडत नव्हते.

सर्व नातेवाइक, गावातील सर्व जागा, शेताकडे असा सर्वत्र शोध घेतला. पण सापडत नसल्याने सोशल मीडियावर दोन बालके हरवली असल्याचे संदेश सर्वत्र टाकण्यात आले. दिवसभर सर्वत्र शोध घेण्यात आला. कयाधू नदीपात्रातही शोध घेतला. परंतु ते काही सापडले नाहीत. शेवाळा येथील मंदिराजवळील पायऱ्यानंतर एका ठिकाणी पाय घसरल्याची ओळखण आढळली. तिथेही दिवसा शोध घेतला. परंतु सापडले नाहीत. अखेर सायंकाळी साडेसहा सात वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात त्या ओळखणीजवळ माणसांना खाली सोडण्यात आले. त्यावेळी दोघेही भाऊ हातात हात घेऊनच तिथे मृतावस्थेत आढळल्याने एकच धक्का बसला. मृतदेह पाहताच नातेवाइकांनी टाहो फोडला.

अखेरच्या क्षणीही भावाचा हातात हातदोघे चुलत भाऊ. दोघांची नेहमीची गट्टी. एकत्रितच खेळायचे. आज दोघेही एकाच वेळी खेळताना गायब झाले. स्वराज आणि शिवराज यांची दोस्ती पक्की होती. दिवसभराच्या शोधानंतर कयाधू नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हाही दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडलेले होते. अखेरच्या क्षणीही भावाचा हात सोडला नाही. हे दृश्य पाहून उपस्थित गहिवरून गेले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू