शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

बैल परवडत नाही म्हणून भाऊ आणि भाच्यानी खांद्यावर घेतले ‘जू’, पैसे आणायचे कुठून?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 07:40 IST

हिंगोली जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा, पैसे आणायचे कुठून? बैलजोडीला मोजावे लागतात ६० ते ८० हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क, वसमत (जि. हिंगोली) : अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी परवडत नाही. बैलजोड्या महाग झाल्याने अल्पभूधारक शेतकरी उत्पन्न काढणार काय अन् लागवड करणार काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. अशात शेती मशागत व पेरणीसाठी बैलजोडी मिळाली नसल्याने शेतकरी बालाजी पुंडगे यांनी चक्क सख्खा भाऊ व साडूच्या मुलास औताला जुंपून हळदीच्या शेतात सरी मारली. शेत मुख्य रस्त्यावर असल्याने हा प्रकार अनेकांच्या समोर आला.

अर्धा एकरातील सरी दोघांनी पूर्ण केली- बालाजी पुंडगे यांना दोन एकर शेतजमीन असून अर्धा एकरावर हळद आहे. भाऊ व इतर परिवार रोज मजुरी व शेतीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकतात. सोमवारी त्यांनी आपल्या शेतात हळदीसाठी सरी (दौसा) मारण्यास सुरुवात केली.- सरीसाठी बैल आणायचे कोणाचे आणि कोठून? हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यामुळे लहान भाऊ मनोहर पुंडगे व त्यांच्या साडूच्या मुलास औताला जुंपले. दोघांच्या खांद्यावर औताचे जू देऊन सरी पूर्ण केली. 

बैलजोडी कशी परवडणार? 

  • बालाजी पुंडगे यांचे शेत वाई ते बोल्डा मार्गावर आहे. सरी मारताना बैलाऐवजी माणसाद्वारे औत हाकले जात असल्याचे पाहून अनेकांनी त्या ठिकाणी थांबून हा प्रकार पाहिला. 
  • यावेळी प्रत्येकाजवळ भावुक होत त्यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या. रोज मजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार? बैलजोडी घ्यायची म्हटल्यावर ६० ते ८० हजार मोजावे लागतात, असेही त्यांनी सांगितले.
टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी