शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच; पंचायत समितीचा डाटा एन्ट्री ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:04 IST

आरोपीच्या विरोधात विविध कलमान्वये औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- हबीब शेखऔंढा नागनाथ (हिंगोली): घरकुलचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना येथील पंचायत समिती कार्यालयाच्या घरकुल विभागातील डाटा एंट्री ऑपरेटला हिंगोली लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने रंगेहाथ पकडले. अजय दशरथ पहारे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात विविध कलमान्वये औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयात घरकुलासह इतर वैयक्तिक कामासाठी पैश्याची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीत वारंवार वाढ होत आहे. त्यातच घरकुलचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटरला गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या वडिलांचे नावे आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे. सदर घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे तक्रारदार व त्यांचे वडिलांचे बँक खात्यावर जमा करण्यासाठी पंचायत समितीचे डाटा एन्ट्री ऑपरेटर अजय दशरथ पहारे यांने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. 

याबाबत तक्रारदाराने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने याची ११ डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे एसीबीच्या पथकाने औंढा येथील पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागात सापळा रचला. दुपारी साडेतीन वाजता पहारे याने दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. 

आरोपी विरोधात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबी नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार, पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक जाधव पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पंचलिंगे पोलीस हवालदार  भगवान मंडलिक पोलीस हवालदार अकबर शेख पोलीस शिपाई शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी