शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसचे ब्रेकफेल, प्रवाशांमध्ये धडधड वाढली; मात्र, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By विजय पाटील | Updated: May 10, 2024 20:00 IST

बसमधील कोणत्याही प्रवाशांना कसलीही इजा पोहोचली नसल्यामुळे चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले.

हिंगोली :  हिंगोली-पुसेगाव-जांभरुन या चालत्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे सदरील एस. टी. बस पाचशे मीटर बिनाब्रेकची न्यावी लागली. यावेळी चालकाने सतर्कता दाखविल्यामुळे बसमधील ४२ प्रवासी सुखरुपणे खाली उतरु शकले. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशांना कसलीही इजा पोहोचली नसल्यामुळे चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले.

१० मे रोजी दुपारी २: १५ वाजता हिंगोली येथून हिंगोली-पुसेगाव-जांभरुन या बसचे दुपारी २: ४५ वाजेदरम्यान नर्सी (नामदेव) जवळील खराटी पुलाजवळील पेट्रोलपंपाजवळ ब्रेकचे जॉईन्डर तुटले. त्यामुळे बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लगेच लक्षात आली. आपल्या बसमध्ये ४२ प्रवासी आहेत. सर्व प्रवासी सुखरप वाचले पाहिजेत, कोणालाही दुखापत झाली नाही पाहिजे, असा मनाशी विचार करुन बसवर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवत रस्त्याच्याकडेने इतर वाहनाला धक्का न लावता बस व्यवस्थित चालविली. जवळपास ५०० मीटर सदरील बस बिनाब्रेकची नेण्यात आली. नर्सीपासून जवळ असलेल्या जि. प. शाळेसमोर बस आल्यानंतर बस व्यवस्थित उभी करुन प्रवाशांना खाली उतरण्यात आले. यानंतर चालकाने प्रवाशांना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले. चालकाचे हे बोल ऐकताच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

चालकाला होता विश्वास; कोणालाही होणार नाही दुखापत...बसचे ब्रेक अचानक निकामी झाले असले तरी बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत होणार नाही, याचा विश्वास चालकाला होता. चालक माधव कुंडलिक मालवे यांनी सावकाश बस रस्त्याच्या कडेने नेत, इतर कोणत्याही वाहनाला धक्का न लागता चालविली. चालत्या बसला थांबविणे शक्य नव्हते. त्यामुळे चालकाने प्रयत्नाची पराकाष्टा केली. अखेर चालकाच्या प्रयत्नाला यश आले आणि जि. प. शाळेसमोर येवून बस थांबली. काही प्रवाशांना बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले होते. यावेळी इतर प्रवाशांना सांगितले तर गोंधळ उडून जाईल म्हणून त्यांनी गप्प बसणे पसंत केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportएसटी