शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीपासून तब्बल १००० किमी दूर सापडला मुलगा; ६ वर्षांनी लेकाची भेट, आईला अश्रु अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:19 IST

विशाखापट्टणम येथील श्रद्धा फाऊंडेशनने मनोरुग्ण वासुदेव याच्यावर केले उपचार; बरा झाल्यानंतर संस्थेनेचे घरी आणून सोडले, भेटीनंतर आईला अश्रु अनावर

- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली): कुटुंबापासून दुरावलेल्या वासुदेवच्या प्रतीक्षा करीत असलेल्या आईचे डोळे अक्षरश: कोरडे झाले. पण, सहा वर्षानंतर असा एक दिवस असा उजाडला की त्याच्या आईच्या आनंदाला पारावार नव्हता. तब्बल १००० किमी दूर विशाखापट्टणम येथील श्रद्धा फाऊंडेशनच्या मदतीने पुन्हा घरी परतलेल्या वासुदेवची गळाभेट घेताना त्याच्या आईने आनंदाश्रू अनावर झाले. सगळे कुटुंबच आनंदी झाले.

गोरेगाव येथील वासुदेव ज्ञानबा पोहनकर (वय ४०) हा २०१९ मध्ये घरून निघून गेला. तेव्हापासून घरचे त्याचा शोध घेत होते. परंतु तो सापडला नाही. वासुदेव हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे रस्त्यावर फिरताना आढळून आला असता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (कर्जत) व विशाखापट्टनम येथील ‘एयुटीडी’ स्वयंसेवकांकडून त्याला संस्थेत घेऊन आश्रय दिला. मनोरुग्ण अवस्थेत असल्याने त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतर वासुदेवची मानसिक अवस्थेत सुधारणा झाल्यानंतर संस्थेने त्याच्या घराचा शोध घेतला. वासुदेव यानेच त्यानंतर घराचा पत्ता सांगितला. संस्थेने मग थेट गोरेगाव गाठले व कुटुंबाच्या स्वाधीन वासुदेवला केले.

१० जानेवारी रोजी कर्जत (महाराष्ट्र) येथील संस्थेत वासुदेवला आणून औषधोपचार सुरू केले. पूर्णपणे बरा झाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी ७ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे पोहोचले. सहा वर्षांनंतर वासुदेव घरी आल्याचे पाहताच कुटुंबातील सर्व सदस्य आनंदीत झाले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीsocial workerसमाजसेवक