शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही अपहृत बालके सापडली पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:58 IST

शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कमलानगर येथील बालगृहातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात २२ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कमलानगर येथील बालगृहातून दोन मुलांचे अपहरण झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात २२ डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील भानुदास सोनाजी बुक्कन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की हिंगोली शहरातील कमलानगर येथील अनाथ मुलांच्या बालगृहातून त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राचे कोणीतरी अपहरण केले. मुले अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी जवळपास शोध घेऊनही ते सापडत नव्हते. त्यामुळे अखेर ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तसेच विविध पोलीस ठाण्यात हिंगोली येथून दोन मुले मिसिंग असल्याची माहिती व त्यांचे फोटोही संबधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले होते. २५ डिसेंबर रोजी ही दोन्ही मुले पुणे येथील रेल्वेस्थानक परिसरात फिरत असताना तेथील पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी हिंगोली येथील पोलिसांना मुले सापडल्याची माहिती दिली. हिंगोली येथीलच मुले आहेत, या खात्रीसाठी मोबाईलवर फोटोही पाठविले. त्यानंतर हिंगोली येथीलच मुले असल्याचे स्पष्ट झाले.दोन्ही मुलांना पुणे येथील बालगृहात ठेवले आहे. संबंधित बालगृहाच्या अधीक्षकांशीही हिंगोली पोलिसांनी दूरध्वनीवरून संपर्क करून मुलांविषयी खात्री करून घेतली. लवकर दोन्ही मुले पालकांच्या स्वाधीन केले जातील, असे पोउपनि गोहाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. हिंगोली येथून पोलिसांचे पथक दोन्ही मुलांच्या नातेवाईकांना घेऊन पुण्याला जाणार आहेत.पोलिसांचे पथक पुण्याला...हिंगोली येथील बेपत्ता मुले पुण्यात सापडली आहेत. त्यामुळे हे दोन्ही मुले पुण्यापर्यंत कसे काय पोहोचली. ती स्वत:हून गेलीत का? त्यांचे कोणी अपहरण केले. याची माहिती घेतली जाणार आहे. हिंगोली येथून पोलीस पथक पुण्याला जाऊन या दोन्ही बालकांना ताब्यात घेणार आहे. अचानक मुले बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. परंतु आता मुलांचा शोध लागल्याने नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. लवकरच मुलांना त्यांच्या स्वाधीन केले जाईल. मुलांचे अपहरण करण्यात आल्याचे समजताच महिला व बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत संबधित शाळेची भेट घेऊन चौकशी केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी