शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आंबा चौंडी येथील वनविभागाच्या कार्यालय परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:59 IST

वसमत तालुक्यातील अंबा चोंडी येथील वनविभाग कार्यालयाच्या आवारात आज सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला.

कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील अंबा चोंडी येथील वनविभाग कार्यालयाच्या आवारात आज सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याचा संशय ग्रामस्थांतून व्यक्त होत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आंबा चोंडी येथील वन विभाग कार्यालयाच्या आवारात पानटपरी जवळ वाई गोरखनाथ येथील नागेश बाबूराव खंदारे (२८) यातरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. ग्रामस्थांनी कुरुंदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी डीवायएसपी भोरे, सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके,  सपोउपनि शंकर इंगोले यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाला पाचारण केले. परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. शवविच्छेदनच्या अहवालानंतरच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.

कुरुंदा पोलिसांनी मयत नागेश खंदारे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नाही. घटनास्थळाजवळच रेल्वेस्थानक व बसस्थानक असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसHingoliहिंगोली