शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या संमतीनेच ‘त्या’ चिमुकल्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:55 IST

तालुक्यातील कहाकर खु. येथे निरागस सहा वर्षीय बालकाच्या हत्येचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्रीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सेनगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी मयत बालकाच्या आईला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील कहाकर खु. येथे निरागस सहा वर्षीय बालकाच्या हत्येचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्रीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सेनगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी मयत बालकाच्या आईला अटक केली आहे.सेनगाव तालुक्यातील कहाकर खु. येथे १९ ते २० मार्चदरम्यान कहाकर खु. ते सिनगी खांबा या दोन गावांच्या शिवारातील वेशीवर शेतामध्ये गजानन पंडित शिंदे (६) या बालकाचा गळा आवळून खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत झुडपामध्ये फेकून दिल्याचा प्रकार समोर आला होता. सदर बालकाचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचा अंदाज पूर्वीपासूनच पोलिसांना होता. फिर्यादीतही तसेच म्हटले होते. या प्रकरणात मयत बालकाचा मामा महादजी आयाजी डोखळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी काशीराम आत्माराम काळेविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. मयत बालकाच्या आईसोबत अनैतिक संबंधाला अडथळा येत असल्याचा कारणामुळे खून केल्याची फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून आरोपी काशीराम काळे यास अटक केली होती. पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपी काळे यास २५ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या पोलीस कोठडीदरम्यान आरोपी काळे याने गुन्ह्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे. मयत बालक गजानन शिंदे (६) याची आई उषाबाई पंडितराव शिंदे (२६) हिच्यासोबत आपले प्रेमसंबंध होते. आम्हा दोघांना लग्न करावयाचे होते, पण भविष्यात हा मुलगा अडसर होईल, या भीतीने सदर बालकाचा त्याच्या आईच्या संमतीने आपण गळा आवळून खून केल्याचे सांगितले आहे.आरोपीने कबुली जवाब दिल्यानंतर मयताची आई उषाबाई शिंदे हिला शनिवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे. आईच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सेनगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. केवळ प्रेमसंबंधात अडथळा ठरतोय म्हणून निरागस सहा वर्षीय बालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर हे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी