सालेगाव येथे रक्तदान शिबिरात ७१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:29+5:302021-01-08T05:36:29+5:30

हिंगोली : माजी खा.स्व. विलासराव गुंडेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ४ जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

Blood donation of 71 people in blood donation camp at Salegaon | सालेगाव येथे रक्तदान शिबिरात ७१ जणांचे रक्तदान

सालेगाव येथे रक्तदान शिबिरात ७१ जणांचे रक्तदान

हिंगोली : माजी खा.स्व. विलासराव गुंडेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ४ जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये योगीता मुंढे हिने रक्तदान करून महिलांसाठी आदर्श निर्माण केला. यावेळी केदारनाथ शिक्षण प्रसारक मंडळ तथा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ॲड. स्वप्निल गुंडेवार, माजी जि.प. सदस्य व सरपंच गणेश गुठ्ठे, माजी पं.स. उपसभापती डिगांबर कदम, माजी सरपंच हरिभाऊ झाकलवाडे, पं.स. सदस्य देवीदास ससाणे, आनंद गुंडेवार, पंकज गुंडेवार, शिवाजी काळे, संदीप गुठ्ठे, संतोष गुठ्ठे, बबन गुठ्ठे, मळेकरी, किरण नावडे, आनंद डाढाळे, अंतोषराव गुठ्ठे, भास्कर मुंढे, गणेश मुंढे, परसराम काळे, बजरंग गुठ्ठे, प्रमोद सालेगावकर, बबन कुकडे, चंद्रशेखर गुठ्ठे, शिवाजी मुंढे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. या शिबिरात सालेगाव येथील युवकांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ. दीपाली पाटील, ए.वाय. जटाळे, बंडू नरवाडे, सतीश तडस, नितीश हडंगे, नामदेव खंदारे, चंद्रशेखर गुठ्ठे, अभिषेक गुठ्ठे, शुभम गुठ्ठे, केशव दराडे, मंगेश गुडूप यांनी परिश्रम घेतले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Blood donation of 71 people in blood donation camp at Salegaon