शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पोस्टाच्या कार्यक्रमात केवळ भाजपचेच पदाधिकारी; खासदार सातव यांना डावलल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 19:33 IST

खा. राजीव सातव यांना डावलत राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने केली.

हिंगोली : भारतीय पोस्ट विभागाने उद्घाटनासाठी केवळ भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना बोलावून एकाच पक्षाची भलामण केली आहे, यामुळे खा. राजीव सातव यांना डावलत राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला जाणार असल्याचे खा.राजीव सातव यांनी सांगितले. 

शहरातील पोस्टाची नवीन इमारत आणि इंडियन पोस्ट बँकेची शाखा कार्यरत होण्यासाठी खासदार राजीव सातव यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतली. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या येथील शाखेचा शुभारंभाचा कार्यक्रम आज होता. यासाठी औरंगाबाद पोस्ट मास्टर जनरल कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रके काढली. त्यात केवळ हिंगोलीचे भाजपचे आ. तानाजी मुटकुळे व नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनाच स्थान दिले. हे दोघेही भाजपचेच आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रेमापोटी पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या सर्वच संबंधितांना डावलल्याचा आरोप होत आहे. 

केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विभाग असताना खासदारांना पत्रिकेतून डावलण्यात आल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोस्ट कार्यालयाच्या गेटवर काळे झेंडे दाखविले. यावेळी दत्ता बोंढारे, जुबेरमामू, ॠषिकेश देशमुख, प्रवीण बायस, अशोक सवंडकर, बंटी नागरे, मयूर राठोड, शेख अजिज यांना ताब्यात घेवून शहर पोलिसांनी नंतर त्यांची सुटका केली. यावेळी आ.संतोष टारफे आदींनी त्यांची पोलीस ठाण्यात भेट दिली.

इतरही लोकप्रतिनिधींना डावललेया पत्रिकेवर औपचारिकता म्हणून तरी पालकमंत्री, जि.प.अध्यक्षा, विधान परिषदेच्या आमदारांची नावे असायला हवी होती. मात्र तीही नसल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसने याला थेट विरोध केला असला तरीही इतरांनी केवळ दबक्या आवाजात ही भाजपची अरेरावी सुरू असल्याचा आरोप केला.

हक्कभंग आणणार याबाबत प्रतिक्रिया देताना खा.राजीव सातव म्हणाले, मी या इमारतीसाठी निधी मिळविला. काम झाले तर उद्घाटनाला बोलावले नाही. आता या कार्यक्रमालाही तेच झाले. एवढेच काय जि.प. अध्यक्ष, विधान परिषद सदस्य यांनाही डावलले. मात्र स्थानिक भाजपा आमदारांना तेवढे बोलावले आहे. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक केला हे दिसते. याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध संसदेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचे सातव यांनी सांगितले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनPost Officeपोस्ट ऑफिसHingoliहिंगोली