शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

छत्रपतींच्या नियोजित पुतळ्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:12 AM

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा मानस सोमवारी अखेर भूमिपूजन झाल्याने पूर्णत्वाकडे जाणे हे निश्चित झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा मानस सोमवारी अखेर भूमिपूजन झाल्याने पूर्णत्वाकडे जाणे हे निश्चित झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बाबाराव बांगर हे होते. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजीराव माने, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ.गजानन घुगे, प्रभारी जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अति.पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण मुख्याधिकारी रामदास पाटील, भूषण देशमुख, खंडेराव सरनाईक, विक्रम जावळे यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी व शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते व जनसमुदायाच्या साक्षीने नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी विधीवत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी असलेल्यांना पुतळा सर्वांचाच आहे. सर्वांचेच यासाठी श्रेय आहे. यात कोणतेच राजकारण नसल्याचे सांगितले. तर निधीची अडचण मांडली. त्यांचे भाषण सुरू असतानाच माणिकराव टाकळगव्हाणकर यांनी १ लाख, जगजीतराज खुराणा यांनी १ लाख, पी.आर. देशमुख यांनी १ लाख तर डॉ. शिवाजी नाकाडे यांनी ५0 हजार रुपयांच्या मदत जाहीर केली. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमातील उर्वरित तीन ते साडेतीन लाखांची रक्कमही पुतळ्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.प्रभारी जिल्हाधिकारी जगदीश मिनियार म्हणाले, उच्च न्यायालय व शासनाच्या कठोर नियमांचे पालन करून या पुतळ्याची उभारणी होत आहे. यापुढेही या पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी आपला सर्वांचा हातभार लाभावा, असे आवाहन केले. माजी खा.शिवाजी माने म्हणाले, जयंतीचा कार्यक्रम आला की, पुतळा उभारणीवरून थापा मारहाण्याचे काम होत होते. मात्र आता हे चालणार नाही, हे लक्षात आले. त्यामुळे सर्वांनी मनावर घेतल्याने आज हिंगोलीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जात आहे. कुणीही नाराज होण्याचे कारण नाही. छत्रपती सर्वांचे होते आणि हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. निमंत्रण पत्रिकेची वाट कशाला पहायला पाहिजे? तर यापुढे ही समिती तरुणांच्या स्वाधीन करून मोकळे होऊ, असेही ते म्हणाले.आ.तान्हाजी मुटकुळे म्हणाले, शासनाने जागा व पैसाही दिला. त्यामुळे त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. उद्घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्याचा मानस आहे. इतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या श्रेष्ठींना बोलावून हा भुतो न भविष्यती सोहळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर एका दृष्टांताचा दाखला देत ते म्हणाले, मारोतीला दुग्धाभिषेक करायचे ठरले. मात्र सगळेच दूध आणतील, आपण पाणीच नेले तर काय पडणार असे सर्वांनाच वाटले. शेवटी पाण्याचा अभिषेक घालण्याची वेळ आली होती. तशी निधी उभारणीची गत आहे. पावती पुस्तके चार महिन्यांपासून तिकडेच आहेत. जाहीर केलेलीही रक्कम कुणी देत नाही. मात्र तरीही कोणत्याही परिस्थितीत हा पुतळा उभारला जाईल, असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले, पुतळा उभारणीबाबत गांधी चौकात होणारी हेटाळणीची भाषणे ऐकली. तेथे भाषणाचा कधी योग आला नाही. आज पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमात भाषण करताना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले, पुतळ्यासाठी सर्वांनाच सहभागी करून घेण्यात कोटेकोर नियमांची अडचण आहे. मात्र एक लाखाची वर्गणी देणाºया प्रत्येकाला पुढच्या वेळी प्रमुख पाहुणा करू, असे सांगितले. तर यापूर्वी न.प.चा ठरावच मिळत नसल्याने पुतळा उभारणी झाली नाही. आता ठरावही झाला अन् सगळ्याच बाबी झाल्याने हा पुतळा उभा राहात आहे, असे ते म्हणाले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतिफ पठाण, त्र्यंबक लोंढे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन बालाजी वानखेडे यांनी केले.यानंतर याच ठिकाणी शिवलीला पाटील यांच्या शिवाजी महाराजांवरील कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाही शिवभक्तांची मोठी उपस्थिती होती.शिवप्रतिष्ठानतर्फे हिंगोलीत मिरवणूकशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा करताना शहरातून दुपारी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी गांधी चौक भागातून पुन्हा डीजे व ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यात शिवाजी महाराज व मावळ्यांचा देखावाही होता.सीटी क्लब येथूनही शिवप्रतिष्ठानच्या अन्य एका ग्रुपने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीतही ढोल-ताशे, डीजे, घोड्यावरून स्वारी करणाºया शिवाजी महाराज व मावळ्यांची झांकी होती.दिवसभर शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम पार पडले. मिरवणुका, घोषणा, आतषबाजी याचे चित्र सगळीकडेच पहायला मिळत होते.