अंधारवाडी येथे ग्रामपंचायत भवनचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:17+5:302021-02-05T07:52:17+5:30
सर्वानुमते नवीन वास्तुला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत भवन असे नाव देण्यात आले असून, या नवीन होऊ घातलेल्या ग्रामपंचायत ...

अंधारवाडी येथे ग्रामपंचायत भवनचे भूमिपूजन
सर्वानुमते नवीन वास्तुला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत भवन असे नाव देण्यात आले असून, या नवीन होऊ घातलेल्या ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन* शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संतोष गोरे व अंधारवाडी ग्रामविकास पॅनलप्रमुख गणेश लुंगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व कुदळ मारून करण्यात आले. सदरील नवीन वास्तूचे भूमिपूजन* करण्यात येऊन या ग्रामपंचायत भवनाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत भवन असे नामकरण देण्यात आले. यावेळी हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा ग्राम विकास पॅनल प्रमुख गणेश लुंगे, ग्रामपंचायत सदस्य मनोज डोंगरे, राजकुमार इंगळे, कैलास बुळे, प्रकाश सोळंके, मारुती इंगळे, श्याम कदम, आकाश हलबुर्गी, विक्की भालेराव, धीरज नरवाडे, प्रतीक घुगे, निखील देवकर, बंटी कांबळे यांच्यासह अंधारवाडीच्या ग्रामस्थांची उपस्थिती होती. शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या मुक्ताबाई संतोष गोरे यांच्या पंचायत समिती फंडातून बळसोंड पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये अनेक ठिकाणी विकासाची कामे करण्यात येत आहेत.
फोटो २९एचएनएलपी०१