शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

भीमा-कोरेगाव घटनेचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:05 AM

भिमा कोरेगाव येथील घटनेचे हिंगोली जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच पडसाद उमटण्यास सुरूवात झाली. २ जानेवारी रोजी सकाळपासून आंबेडकरी अनुयायी जनतेकडून आंदोलने व रास्तारोको करण्यात आला. तर वसमत येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास दोन जीप जाळल्या असून मंगळवारी दगडफेक झाली. हिंगोली डेपोच्या ७ बसेसच्या काचा फोडल्या. घटनेच्या निषेधाचे आंबेडकरी जनतेच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ४ जानेवारी रोजी हिंगालीत बंद पाळला जाणार आहे.

ठळक मुद्देहिंगोली : वसमत येथे २ जीप जाळल्या; हिंगोली डेपोच्या ७ बस फोडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भिमा कोरेगाव येथील घटनेचे हिंगोली जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच पडसाद उमटण्यास सुरूवात झाली. २ जानेवारी रोजी सकाळपासून आंबेडकरी अनुयायी जनतेकडून आंदोलने व रास्तारोको करण्यात आला. तर वसमत येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास दोन जीप जाळल्या असून मंगळवारी दगडफेक झाली. हिंगोली डेपोच्या ७ बसेसच्या काचा फोडल्या. घटनेच्या निषेधाचे आंबेडकरी जनतेच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको करून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. ४ जानेवारी रोजी हिंगालीत बंद पाळला जाणार आहे.भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद हिंगोली जिल्ह्यात पडले. आंबेडकरी संघटनांकडून विविध ठिकाणी आंदोलने व रास्ता रोको केला असून बसच्या काचा फोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हिंगोली शहरातून जाणाºया जवळा-पळशी रोडवर काही अज्ञात इसमांनी बसच्या काचा फोडल्याची घटना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.औंढ्यात निषेध- औंढा नागनाथ : येथे हल्ल्याचा शहर बंद ठेवून निषेध नोंदवत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनास दिले.घटनेच्या निषेधार्थ औंढा शहर बंद ठेवून निवेदन देण्यात आले. यावेळी जी.डी.मुळे, वसंत मुळे, सुमेध मुळे, राम मुळे, किरण घोंगडे, अ‍ॅड. गौतम श्रीखंडे, रवी डोंगरदिवे, कपील खंदारे, सुनील नांगरे, राहूल मोगले, बापुराव घोंगडे, बाळासाहेब साळवे, चंद्रकांत सुतारे, गणेश दीपके, मोतीराम कांबळे, निवृत्ती खिल्लारे, संजय घोंगडे, शेख मजहर, नितीन गव्हाणे, योगेश खिल्लारे यांच्यासह बहुसंख्य बौद्ध बांधवांची उपस्थिती होती. यावेळी पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. औंढा बसस्थानकातील तीन बसच्या काचा फोडल्याची घटना सोमवारी घडली.नागेशवाडी येथे रास्तारोको - जवळाबाजार : औंढा ते जवळाबाजार दरम्यान नागेशवाडी फाटा येथे सकाळी ११ वाजता संबोधी मित्रमंडळाच्या वतीने घटनेचा निषेध करून रस्ता रोको आंदोलन केले. १ तासाच्या आंदोलनामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हल्ला करणाºयांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिले.या निवेदनावर तुकाराम बºहाटे, एकनाथ खंदारे, भाऊ खंदारे, बालासाहेब खंदारे, जनार्दन खंदारे, भारत एंगडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. यावेळी सपोनि सुनील नाईक, जमादार शे. खुद्दूस, गजभार, अंबादास विभुते, आदी कर्मचाºयांनी बंदोबस्त ठेवला.आज कळमनुरी बंदकळमनुरी : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी आंबेडकरी अनुयायींच्या वतीने बंदचे आवाहन केले. सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी २ जानेवारी रोजी शहरभर फिरून व्यापाºयांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर घटनेच्या निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी शहर बंद ठेवण्याची व्यापाºयांना आवाहन केले आहे. योवळी शिवाजी पाईकराव, अरुण वाढवे, छप्पन पाईकराव, कैलास खिल्लारे, सुरेश तेलगोटे, सुनिल वाढवे, संजय वाढवे, अमोल कांबळे, सोनू वाढवे, बी.के. खंदारे, दिलीप इंगोले, अक्षय ढगे आदी उपस्थित होते. उद्या ३ जानेवारी रोजी शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्तारोको -हंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी जनतेच्या वतीने मंगळवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच प्रशासनास निवेदन दिले असून ४ जानेवारी रोजी शहर बंदचे आवाहन करण्यात आले. यावेळी दिवाकर माने, रवींद्र वाढे, प्रकाश इंगोले, मिलिंद उबाळे, अ‍ॅड. भुक्तर, सदाशिव सूर्यतळ, सुरेश वाढे, राहुल खिल्लारे, दीपक धांडे, ज्योतिपाल रणवीर, बबन भुक्तर, अक्षय इंगोले, विशाल इंगोले यांच्यासह समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.भीमटायगर सेनेतर्फे निवेदनभीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधाचे भीम टायगर सेनेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. घटनेतील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून हिंगोली बंदची हाक दिली आहे. निवेदनावर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष मनोज डोंगरे, महेंद्र पाईकराव, गजानन वैद्य, बाळू कुºहे, प्रकाश खंदारे, विजय बनसोडे, चंपत कुºहे, अमोल पठाडे यांच्यासह पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.गावगुंडावर कारवाई करा-अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी जनतेवर दगडफेक करणाºयांवर तात्काळ कारवाई करून बहुजन समाजाला न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना दिले.निवेदनावर अ‍ॅड. प्रज्ञावंत मोरे, किरण मोरे, मुरलीधर मोरे, भागोराव मोरे, लिंबाजी मोरे, संदीप मोरे, प्रा. रवींद्र मोरे, पवन मोरे यांच्यासह पहेणी येथील ६६ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.बससेवा बंद : प्रवाशांची तारांबळजिल्हाभरात तणावाचे वातावरण व बस फोडल्या जात असल्यामुळे हिंगोली आगारातील बससेवा मंगळवारी दुपारी २ वाजल्यापसून बंद करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी दिली. जवळपास सातच्या वर बस फोडल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने बससेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला नागरिक तसेच प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. हिंगोली शहरातही तणावपूर्ण शांतता होती. पोलीस अधिकाºयांच्या बैठकाही झाल्या.वसमतमध्ये दोन जीप जाळल्या; दगडफेकीच्या घटनेने वसमत शहरात तणाववसमत : घटनेच्या निषेधार्थ वसमत बंदचे आवाहन केले होते. मंगळवारी आठवडी बाजार असताना वसमत कडकडीत बंद होते. बंदसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी काही तरूणांनी बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक करून काचा फोडल्या. वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. बंदच्या पूर्वसंध्येला एका एसटीवर दगडफेक व दोन जीप जाळल्याची घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत हाताळला. वसमत येथे भीमा कोरेगाव घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंबेडकरी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. आवाहनास वसमतकरांनी प्रतिसाद देत कडकडीत बंदही पाळला. आठवडी बाजारही बंद राहीला. मंगळवारी सकाळी शहरातून भव्य मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने तरूण, कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी व महिलांनी सहभाग नोंदवला. मोर्चा बाजारपेठेतून जात असताना काही तरूणांनी बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक केली. पार्किंग केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक झाल्याने शहरात तणावाचे वातावरण होते. मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गेला. तेथे निषेधाचे निवेदन दिले. भीमा- कोरेगाव घटनेतील दोषींवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाईची मागणी केली. सोमवारी रात्री बसस्थानकाशेजारी उभ्या असलेल्या दोन जीपला अज्ञात इसमांनी पेटवून दिले. यात एम.एच.२३ ई. ४०७९, एम.एच.१४ पी ४४३९ या दोन जिप जाळून नुकसान झाले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविला. सोमवारी रात्री परभणी रोडवर वसमत आगाराची एम.एच.१४ बीसी २२९० या एसटीवर दगडफेक झाली. वसमत येथे निषेध मोर्चा व बंदचे आवाहन करण्यास आंबेडकरी संघटना व पक्ष पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला.भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ सेनगाव बंद४सेनगाव : भीमा कोरेगाव येथील दंगलीची सीआयडीमार्फत चौकशी करून समाजकंटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसह सदर घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सेनगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमा कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद सेनगाव शहरात उमटले. सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक संघटनेच्या वतीने सेनगाव बंदचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठ मंगळवारी दिवसभर कडकडीत बंद होती. घटनेचा निषेध करीत, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे निवेदन दिले. आंदोलनात प्रकाश खंदारे, माजी सरपंच संजय वाघमारे, मनीष वाकळे, राजू वाघमारे, विजय खंदारे, सुनील वाघमारे, वसंत वैराट, अनिल वाघमारे, गोपाल खंदारे, रमेश गायकवाड, रवि गवळी आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होते.