शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आमदारांसह शिक्षक संघटनांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:01 PM

विषय शिक्षक पदोन्नतीसाठी केंद्राऐवजी जिल्हा स्तरावरून समुपदेशन घेण्याच्या मागणीसाठी चार आमदारांसह विविध शिक्षक संघटनांनी १२ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विषय शिक्षक पदोन्नतीसाठी केंद्राऐवजी जिल्हा स्तरावरून समुपदेशन घेण्याच्या मागणीसाठी चार आमदारांसह विविध शिक्षक संघटनांनी १२ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले.आ.संतोष टारफे यांनी याबाबत प्रशासनाला इशारा दिला होता. या आंदोलनात आ.रामराव वडकुते, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.जयप्रकाश मुंदडा, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, काँग्रेसचे संजय बोंढारे, सेनेचे राम कदम हेही सहभागी झाले होते. कोणतीही आवश्यकता नसताना शासन मार्गदर्शन का मागविले? असा सवाल वडकुते यांनी केला. तर मुटकुळे यांनीही जि.प.ने ठराव घेतला असेल तर त्याचा संदर्भ देवून शासनाला पुन्हा मार्गदर्शन मागविण्याची मागणी केली. त्यावर सीईओ एच.पी.तुम्मोड हे ऐकायला तयार नव्हते. मात्र प्रश्नांची सरबत्ती वाढत चालल्याने तसे पत्र शासनाला पाठवून मार्गदर्शन मागविण्याचे ठरले. यासाठी सर्वच आमदारांनी मात्र बराच काळ लढा दिला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांच्या दालनात बैठकीत तसे पत्र दिले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती प्रल्हाद राखोंडे, गटनेते अंकुश आहेर, मनीष आखरे, प्रकाशराव थोरात, मंगला कांबळे, डॉ. सतीश पाचपुते, संजय दराडे, माऊली झटे, नंदकिशोर कांबळे, राजाभाऊ मुसळे, माधव कोरडे, शिक्षणाधिकारी सोनटक्के, रामदास कावरखे, हरिभाऊ मुटकुळे, उत्तम राठोड, ज्ञानबा गारूळे, शामराव जगताप, विश्वनाथ मांडगे, नामदेव नागरे, रामराव वाघडव, मनिष आखरे, संजय राठोड, प्रशांत नाईक, विठ्ठल चौतमल, शशीकांत वडकुते, रमेशराव जाधव, शंकर शेळके, बी. डी. चव्हाण, आदींची उपस्थिती होती. तर शिक्षक संघटनेचे पंडितराव नागरगोजे, विठ्ठल देशमुख, सुभाष जिरवणकर, परमेश्वर वागतकर, रमेश क्षीरसागर, नीळकंठ गायकवाड, गजानन बोरकर, राजेंद्र पाटील, पंडित सिरसाट, व्यंकट जाधव, गौतम खडसे, भीमराव भगत आदी उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या...विषय शिक्षकांच्या पदस्थापनाा जिल्हा स्तरावरून सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशन पद्धतीने करण्यात याव्यात. अतिरिक्त प्राथमिक पदवीधरांचे समायोजन जिल्हा स्तरावरून समुपदेशनाने करावे. रॅण्डम राऊंडमध्ये पदस्थापना दिलेल्या शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्यात. केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक व विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती तत्काळ करावी. शालेय पोषण आहाराची देयके नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित आहेत. ती अदा करण्यात यावीत. हंगामी निवासी वसतिगृहाची देयके द्यावीत. चट्टोपाध्याय व सेवासातत्याची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, यासह विविध मागण्यांसाठी आज उपोषण केले होते. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या चर्चेवरून राजकीय नेत्यांचा आणि प्रशासकीय अधिकाºयांचा उपोषणाच्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला होता.जि. प. प्रशासन : मार्गदर्शन मागविलेशिक्षकांच्या प्रलंबित मागण्यां तात्काळ निकाली काढाव्यात यासाठी आमदार, व राजकीय पदाधिकाºयांची उपोषणास्थळी चढा-ओढ लागली होती. जो-तो धडाकेबाज भाषण करत प्रशासनाला जबाबदार धरत प्रश्न निकाली काढण्याची मागणी करताना दिसून आले.सर्व तालुक्यातील रिक्तपदांचे समानीकरण राहून इयत्ता सहा ते आठ वर्गासाठी विषय शिक्षक पदनिश्चिती करून जिल्हास्तरावरून सेवा जेष्ठतेनुसार समुपदेशनाने पदस्थापना देयाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रशासनाकडून परवानगीची मागणी केली.निवडणुका जवळ येत असल्याने काहीजण नाहक या आंदोलनस्थळी घुटमळत होते. सेनेचे डॉ.बी.डी. चव्हाण या आगंतुक पाहुण्याची बरीच चर्चा होत होती. तर शिक्षण सभापती भैय्या देशमुख नसल्याची तेवढीच चर्चा होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा