लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर २ नोव्हेंबर रोजी विविध मागण्यासंदर्भात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.सीएसी-एसपीव्ही कंपनीने सलग १० ते १२ महिन्यांपासून संगणक परिचालकांचे मानधन दिले नाही. शिवाय काही ग्रामपंचायतीने आतापर्यंत आरटीजीएस असून सुद्धा आॅनलाईन पेंमेट न केल्यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भाचे निवेदन जि. प. प्रशासनास देण्यात आले. संणक परिचालक संघटनेतर्फे आंदोलन करून थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे, संग्राम प्रकल्पातील कमी करण्यात आलेल्या केंद्र चालकांना पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे, डिमांड इनव्हईसचा मानधन देण्यात यावे तसेच निर्मल अभियान सर्वेक्षणाचे मानधन द्यावे यासह विविध मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात म्हणून भीक मांगो आंदोलन केले. यात मोठ्या संख्येने संगणक परिचालक सहभागी झाले होते. जि.प. कार्यालयासमोर ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबून कर्मचारी हातात कटोरी घेऊन भीक मागत होते. शासनापर्यंत कर्मचाºयांच्या मागण्या पोहोचाव्यात व परिचालकांना न्याय मिळावा यासाठी आगळेवेगळे आंदोलन केले. दरम्यान, सभापती प्रल्हाद राखोंडे, विठ्ठल चौतमल, नितीन दाताळ यांनी मध्यस्थी करून आंदोलन सोडविले.
संगणक परिचालकांचे भीक-मांगो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:56 IST