पत्नीस नांदायला का नेत नाही म्हणून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:09+5:302021-05-31T04:22:09+5:30

अंबाळा तांडा येथील उमेश साहेबराव राठोड यांच्या पत्नी सारिका हिला सासरा दत्ता सेवा चव्हाण हे माहेरी घेऊन गेले होते. ...

Beating his wife for not taking a bath | पत्नीस नांदायला का नेत नाही म्हणून मारहाण

पत्नीस नांदायला का नेत नाही म्हणून मारहाण

अंबाळा तांडा येथील उमेश साहेबराव राठोड यांच्या पत्नी सारिका हिला सासरा दत्ता सेवा चव्हाण हे माहेरी घेऊन गेले होते. मात्र पंधरा दिवसांनंतरही उमेश राठोड हे पत्नीला आणण्यासाठी गेले नव्हते. त्यामुळे सासरा दत्ता चव्हाण, मेव्हणा रवी दत्ता चव्हाण, चुलत सासरा वकील सेवा चव्हाण (सर्व, रा. ब्राह्मणवाडा, ता. औंढा) हे उमेश राठोड यांच्या घरी आले व तुझ्या पत्नीला नांदायला नेणार की नाही, असे विचारत होते. मात्र तुम्ही जसे घेऊन गेले तसे आणून सोडा असे उमेश राठाेड म्हणाल्याने रवी चव्हाण याने दगडाची चीप उचलून उमेश यांच्या डोक्यात मारली. यात त्यांच्या डोक्यास खरचटले. याप्रकरणी उमेश राठोड यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह आर.एन. ठोके करीत आहेत.

Web Title: Beating his wife for not taking a bath