आता व्हा आत्मनिर्भर; गटांसह १८ जणांना मिळणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:31+5:302021-09-04T04:35:31+5:30

हिंगोली : असंघटीत क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रात आणणे, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य ...

Be self-reliant now; 18 people including groups will get grants | आता व्हा आत्मनिर्भर; गटांसह १८ जणांना मिळणार अनुदान

आता व्हा आत्मनिर्भर; गटांसह १८ जणांना मिळणार अनुदान

हिंगोली : असंघटीत क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रात आणणे, त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४१ जणांनी यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.

असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगाच्या स्पर्धा क्षमतेत वाढ करणे, क्षेत्रास औपचारिक दर्जा प्रदान करणे आणि शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वंकष मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंदर्भात जिल्ह्याला १९ लाभार्थी निवडीचे उद्दिष्ष्ट मिळाले असून, आतापर्यंत ४१ अर्ज आले आहेत. यातील १० अर्ज परिपूर्ण सबमीट झाले असून, ३१ अर्जाची पडताळणी सुरू आहे.

एक जिल्हा एक उत्पादन

एक जिल्हा -एक उत्पादन या धर्तीवर ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी जिल्हानिहाय पारंपरिक पिके, उपलब्ध समूह आधारित क्लस्टर, कच्च्या मालाचे उत्पादन, भाैगोलिक मानांकने या आधारावर एक उत्पादन निश्चित केले आहे. हिंगोली जिल्ह्यात हळद व मसाला हे पीक निश्चित करण्यात आले आहे.

असा करा अर्ज

- योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना नावाचे इंग्रजीतून संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. यावर अर्ज सादर करता येणार आहे, तसेच मदतीसाठी एक नंबरही देण्यात आला आहे.

जिल्हा कृषी अधिकाऱ्याचा कोट

असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांच्या स्पर्धात्मक क्षमतेत वाढ करणे. या क्षेत्रास औपचारिक दर्जा प्रदान करणे, तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनासाठी सर्वंकष मूल्य साखळी विकसित करण्यासाठी या योजनेतून सहाय्य करण्यात येते. जास्तीत जास्त लाभार्थींनी अर्ज सादर करावेत.

- बळीराम कच्छवे, जिल्हा कृषी अधीक्षक, हिंगोली

तालुकानिहाय उद्दिष्ट

तालुकालाभार्थी संख्या

हिंगोली ०४

कळमनुरी ०३

वसमत ०४

औंढा ना. ०४

सेनगाव ०३

Web Title: Be self-reliant now; 18 people including groups will get grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.