लसीकरण रद्द होणार नाही याची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:28+5:302021-09-08T04:35:28+5:30
हिंगोली : लसीकरण केंद्रावर नियमित लसीकरण मोहीम सुरू ठेवावी, कोणत्याही परिस्थितीत लसीकरण रद्द होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा ...

लसीकरण रद्द होणार नाही याची काळजी घ्या
हिंगोली : लसीकरण केंद्रावर नियमित लसीकरण मोहीम सुरू ठेवावी, कोणत्याही परिस्थितीत लसीकरण रद्द होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन भायेकर यांनी दिल्या.
येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रात आरोग्य सहायकांच्या मासिक आढावा बैठकीत ७ सप्टेंबर रोजी ते बोलत होते. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांची उपस्थिती होती. लसीकरणाच्या बाबतीत सर्वांनी काम वाढवावे, लसीकरण रद्द होऊ देऊ नये, तसेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही डॉ. भायेकर यांनी यावेळी दिल्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेतला. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनीही पारेषण काळात उद्भवणाऱ्या साथरोग, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया या कीटकजन्य आजाराबाबत मार्गदर्शन केले. गावनिहाय कंटेनर सर्वेक्षण करणे, तसेच ज्या गावात तापाचे रुग्ण आढळून आले तेथे जलद ताप सर्वेक्षण, ॲबेटिंग करणे, गप्पी मासे पैदास केंद्र स्थापन करणे आदी सूचना केल्या. गावातील तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे, साचलेले डबके, टायर्स, फुलदाणी, करवंट्या आदींमध्ये राॅकेल, जळके ऑइल टाकावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागातील रेवती पिंपळगावकर, अमोल कुलकर्णी, मुन्नाफ यांच्यासह आरोग्य सहायक व सहायिकांची उपस्थिती होती.
फोटो :