वायचाळ पिंपरी येथे बर्वे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST2021-02-05T07:55:47+5:302021-02-05T07:55:47+5:30

सवना : सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक एम. जी. बर्वे यांचा शाळा ...

Barve felicitated at Vaichal Pimpri | वायचाळ पिंपरी येथे बर्वे यांचा सत्कार

वायचाळ पिंपरी येथे बर्वे यांचा सत्कार

सवना : सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक एम. जी. बर्वे यांचा शाळा व ग्रामस्थांकडून ३० जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला. बर्वे हे २०२०पासून वायचाळ पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ३० जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल शाळा व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक पी. पी. कव्हर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख साहू, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे, माजी सरपंच जयराम देवकर, जगन कोघे, मुख्याध्यापक पवार, रिंगल वानखेडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बर्वे यांचा शाल, श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व्ही. डी. बळी यांनी केले तर प्रास्ताविक एम. जी. भिसे यांनी केले. एस. डी. खिल्लारी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पी. आर. भुते, एस. पी. शिंदे, वर्षा शिंदे, सुचिता सौंदळे यांनी सहकार्य केले.

फोटो नंबर १२

Web Title: Barve felicitated at Vaichal Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.