जिल्हा कचेरीवर बंजारा समाजबांधव, शिवसैनिकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:35+5:302021-02-21T04:55:35+5:30
हिंगोली : पूजा चव्हाण प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप ...

जिल्हा कचेरीवर बंजारा समाजबांधव, शिवसैनिकांचा मोर्चा
हिंगोली : पूजा चव्हाण प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप करत गोर बंजारा समाज बांधव व शिवसेनेच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्यभरात पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत आहे. कोणत्याही प्रकाराची शहानिशा न करता विरोधक व काही मीडिया वनमंत्री संजय राठोड यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणी पोलीस यंत्रणेच्या तपास अहवालात काहीही निष्पन्न झाले नाही. तसेच चव्हाण कुटुंबीयांनीही कोणतीही तक्रार दिली नाही. तरीही राजकीय द्वेषापोटी भाजपचे काही नेत्यांकडून मंत्री संजय राठोड व पूजा चव्हाण यांची बदनामी करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत ही होत असलेली बदनामी तत्काळ थांबवा, तसेच बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी, या मागणीसाठी बंजारा समाज बांधव व शिवसेनेच्या वतीने आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जुन्या जिल्हा परिषदेच्या मैदानावरून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोंच्या संख्येंने गोर बंजारा समाज बांधव, शिवसैनिक सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आ. संतोष बांगर, ॲड. पंजाबराव चव्हाण, ॲड. संतोष राठोड, संगीताताई चव्हाण, शंकर आडे, संजय राठोड, सुनीता जाधव, उषा जाधव, रेखा देवकते, नारायण बाबा राठोड, रमेश जाधव, उत्तम पवार, श्रावण चव्हाण, सुरज राठोड, गणेश चव्हाण, गोपीचंद जाधव, दिलीप बांगर, अशोक चव्हाण, संदीप राठोड, अविनाश चव्हाण, अनिल राठोड, वसंत जाधव, अंकुश राठोड, रमेश राठोड, डॉ. मुकेश पवार,भालूसिंग राठोड, रवी जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.