जिल्हा रुग्णालयातच सामाजिक नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोराेनाची तिसरी लाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:53+5:302021-09-02T05:03:53+5:30
जिल्हा रुग्णालयात अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, अपघात विभाग आदी जवळपास १२ ओपीडी आहेत. या ठिकाणी आलेल्या रुग्णांना मास्क, सामाजिक अंतराबाबत ...

जिल्हा रुग्णालयातच सामाजिक नियमांकडे पाठ; कशी रोखणार कोराेनाची तिसरी लाट?
जिल्हा रुग्णालयात अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, अपघात विभाग आदी जवळपास १२ ओपीडी आहेत. या ठिकाणी आलेल्या रुग्णांना मास्क, सामाजिक अंतराबाबत सूचना देणे आवश्यक असताना, कोणीही सूचना देत नाही. तिसरी लाट रोखण्यासाठी सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असताना जिल्हा रुग्णालयात याचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
- ओपीडी हाउसफुल
डेंग्यू, मलेरिया, हिवताप व इतर आजारांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सर्वच ओपीडी फुल होत आहेत. रुग्णालयात येतेवेळेस रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मास्क, सामाजिक अंतराबाबत सूचना देणे आवश्यक असताना त्याकडे कानाडोळा केला जात आहे.
- डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
सध्या पावसाळ्याचे दिवस असून डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी साथीच्या आजाराचे ४९ रुग्ण झाले होते. काळजी घेण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे.
- मास्कबाबत सूचना देणे गरजेचे
जिल्हा रुग्णालयात साथीच्या आजारात वाढ होत असताना कोणताही डाॅक्टर रुग्णांना, तसेच नातेवाइकांना सूचना देत नाही. कोरोना रोखण्यासाठी मास्कबाबत सूचना देणे आवश्यक आहे.
- सर्वांना सूचना दिल्या
कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातील सर्वच ओपीडींना सूचना दिल्या आहेत. ओपीडीसमोर कोणीही गर्दी करू नये. कोरोना कमी झाला असला तरी संपलेला नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करून थांबू नये.
-डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
पहिला फोटो १
दुसरा फोटो २
स्टार १११९