लोखंडी गजाळी चोरण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST2021-04-19T04:26:49+5:302021-04-19T04:26:49+5:30

या प्रकरणी सुरेश मारोतीराव मुंडकर (रा.कारेगाव, ता.देगलूर ह.मु. मालेगा) यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

An attempt to steal an iron fence failed | लोखंडी गजाळी चोरण्याचा प्रयत्न फसला

लोखंडी गजाळी चोरण्याचा प्रयत्न फसला

या प्रकरणी सुरेश मारोतीराव मुंडकर (रा.कारेगाव, ता.देगलूर ह.मु. मालेगा) यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. वसमत ते नांदेड मार्गावरील हॉटेल राजरसोई परिसरात पुलाच्या सिमेंट काँक्रीटच्या बांधकामासाठी लोखंडी गजाळी कट करून ठेवली होती. अंदाजे ७० किलो असलेली गजाळी एका ऑटोरिक्षामध्ये टाकून चोरटे नेत होते. मात्र, यावेळी येथील एकाने ऑटोरिक्षात गजाळी टाकत असताना, पाहिल्याचे चोरट्यांच्या लक्षात आल्याने चोरट्यांनी ऑटोरिक्षा जागेवरच सोडून पळ काढला. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

हिंगोली : हिंगोली पोलीस प्रशासनाच्या वतीने जुगार अड्ड्यावर कारवाई करीत जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार, वसमत ग्रामीण पोलीस ठाणेअंतर्गत एका जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असे ३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जुगार खेळविला जात असल्याचे चित्र या कारवाईमुळे समोर आले आहे.

Web Title: An attempt to steal an iron fence failed