शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाहून जाणारे मराठवाड्याचे हक्काचे पाणी साठविण्याचा प्रयत्न : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:12 IST

Water Resources Minister Jayant Patil on Marathwada Water crisis : सिद्धेश्वरचा जसा एडीबी बँकेकडे ४५० कोटींचा प्रस्ताव पाठविला. तसा जायकवाडीचाही जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील धरणे जुनी आहेत.कालव्यांची पाणीवहन क्षमता घटली आहे.

हिंगोली : मराठवाड्याला १०२ टीएमसी पाणी सिंचनासाठी मिळणे अपेक्षित आहे. मात्र जवळपास ३० टीएमसी पाणी इतर राज्यांत वाहून जाते. ते साठविण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न शासनाकडून राहणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ( Attempt to save the water of Marathwada that is being carried away, says  Water Resources Minister Jayant Patil ) 

यावेळी समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले, लातूरला पाणीसाठ्याची चांगली संधी आहे. पाणी खाली वाहून जाण्यापेक्षा ते साठवून समतोल राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यातील धरणे जुनी आहेत. कालव्यांची पाणीवहन क्षमता घटली आहे. सिद्धेश्वरचा जसा एडीबी बँकेकडे ४५० कोटींचा प्रस्ताव पाठविला. तसा जायकवाडीचाही जागतिक बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात जलसिंचनाचे नवे स्त्रोत निर्माण करण्यासह असलेल्या स्त्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करून सिंचन दुपटीने करण्यासाठी इस्त्रायलच्या धर्तीवर पाणी वापराचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी इस्त्रायलमधील तज्ज्ञांशी ऑनलाईन बैठकाही झाल्या.

हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या बैठकीतील विविध मुद्दे मांडून कयाधूवर कळमनुरी तालुक्यातही बंधाऱ्यांसाठी फेरसर्व्हे करण्याचा आदेश दिला. तसेच अनुशेष दूर करण्यासाठी इतर काय पर्या करता येतील, हे तपासण्यासही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. तर नांदेडला पैनगंगेवरील इसापूर प्रकल्पात १०२ दलघमीची तूट आहे. ती भरून काढण्यासाठी खरबीवरून पाणी वळवण्याचा प्रस्ताव होता. मात्र स्थानिकांची भावना लक्षात घेता त्यांच्या हक्काचे पाणी जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आगामी निवडणुकांत पक्ष स्वबळावर लढणार की आघाडीत असे विचारले असता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधून यावर निर्णय घ्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMarathwadaमराठवाडाWaterपाणीHingoliहिंगोली