सेनगावात तीघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST2021-01-21T04:27:34+5:302021-01-21T04:27:34+5:30

सेनगाव : शहरातील संदीप वानरे यास बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर हिंगोली सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ...

Atrocities case filed against three in Sengaon | सेनगावात तीघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सेनगावात तीघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सेनगाव : शहरातील संदीप वानरे यास बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर हिंगोली सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन सेनगाव पोलीस ठाण्यात १८ जानेवारीला तीघांवर ॲट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सेनगाव येथील जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या सावन जाधव यांच्या घरासमोर संदीप जगन वानरे या युवकास १८ जानेवारी राेजी रात्रीच्या सुमारास क्षुल्लक कारणावरुन आरोपीकडून जीवे मारण्याच्या उद्देश्याने खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यात लाकडी काठ्याचा जबर मार बसल्याने वानरेच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संदीप यांच्या फिर्यादीवरुन सेनगाव पोलीस ठाण्यात आरोपी अनिल गीते, सावन जाधव, सुरेश नामदेव गोरे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गीतेला अटक केली तर दोन आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे करीत आहेत.

Web Title: Atrocities case filed against three in Sengaon