सुविधा नसल्याने या भागातील नागरिकांवर हेतूपुरस्सर अन्याय करण्यात येत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त करण्यात येत होती. याबाबत २८ ऑगस्ट रोजी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते, तर आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. २ सप्टेंबर रोजी नगर परिषद प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त रामदास पाटील, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी या भागातील कामे ताबडतोब सुरू करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते, तसेच ५ सप्टेंबर रोजी नगर परिषदेचे अभियंता विजय इटकापल्ले यांनी या भागात येऊन प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली. निवेदनावर ॲड. रावण धाबे, रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, ॲड. मारोती सोनुले, अतिकूर रहेमान, भगवान गायकवाड, सचिन पट्टेबहाद्दूर, रमेश ठोके, सुधाकर वाढवे, फेरोज पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शाहूनगर भागात रस्त्यांबाबत आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST