शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

गुगलला विचारा, सर्वात खोटारडा कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:50 IST

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भाजपच्या काळात पेट्रोल, डिझेलसह सर्वच इंधनाची होणारी भाववाढ व शेतीमालाला भाव नसल्याने काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले. खा. राजीव सातव यांनी मोदींवर जोरदार टीका केली.या आंदोलनात खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. बाबा नाईक, दिलीप देसाई, डॉ.सतीश पाचपुते, भगवान खंदारे, विनायक देशमुख, केशव नाईक, श्यामराव जगताप, ज्ञानेश्वर जाधव, भागोराव राठोड, शिवाजी मस्के, सीमा हाफिज, शोभा मोगले, सुमेध मुळे, विलास गोरे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सकाळी ११ वाजता म.गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ झाला. इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर खा.सातव व कार्यकर्त्यांनी हातगाड्यावर मोटारसायकल ढकलत नेत अशी वेळ सर्वसामान्यांवर आल्याचे सांगितले. हातगाडा ओढण्याची ही पदयात्रा गांधी चौक ते गणपती चौक व पुन्हा गांधी चौक अशी काढण्यात आली. यावेळी दिवसभर या मंडपात आ.टारफे व कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केले. या ठिकाणी खा.सातव यांच्या भाषणाने सायंकाळी या आंदोलनाचा समारोप झाला. यावेळी सातव म्हणाले, जगात सर्वांत खोटा व्यक्ती कोण? असा प्रश्न गुगलला विचारला तर तेही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दाखवू लागले आहे.

अतिशय खोटे बोलून सत्तेत आलेल्या या माणसाने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतीमालास भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, संख्येने सर्वाधिक असलेले लहान व्यापारी हैराण आहेत. तर सर्वांत मोठ्या अदानी, अंबानी, माल्या, मोदीसारख्या मोठ्या व्यापाऱ्यांवर मेहरबान होत आहे. या शासनाच्या काळात भ्रष्टाचार करून लोक पार्सलही नेत आहेत. महिलांचे प्रश्नही सुटले नाहीत. चीन, पाकिस्तान पुन्हा डोके वर काढत आहे. माध्यमांसह न्यायालयांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. मंत्रालयात तर जाळ्या लावताहेत. कारण तेथे जोकर वाढल्याचा टोलाही लगावला. शेतकºयांना बायका लेकरांसह रांगेत लावणाºयांना जनता जागा दाखवणार आहे. भाजप-सेनेच्या सरकारमधले लोकच लाभार्थी झाले. भाजप हे अत्याचार करीत असताना सेनेचे लोक राजीनाम्याचे नाटक करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलनcongressकाँग्रेसgoogleगुगल