अष्टधातूची मूर्ती हिंगोलीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:42+5:302021-09-11T04:29:42+5:30

येथील शिवसेना सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच मागील वर्षापासून पंचधातूच्या मूर्तीची स्थापना ...

Ashtadhatu idol filed in Hingoli | अष्टधातूची मूर्ती हिंगोलीत दाखल

अष्टधातूची मूर्ती हिंगोलीत दाखल

येथील शिवसेना सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच मागील वर्षापासून पंचधातूच्या मूर्तीची स्थापना केली जाते. दरम्यान यावर्षीही अष्टधातूची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय मंडळाचे पदाधिकारी तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक अशोक नाईक यांच्यासह मंडळाने घेतला. पंचधातूची मूर्ती उत्तर प्रदेशातून मागविण्याचे निश्चित केले. त्यानुसार उत्तर प्रदेशातून दिल्ली व त्यानंतर दिल्ली येथून नागपूरचा विमानप्रवास करीत गणपती बाप्पाची मूर्ती नागपूरला आली.

नागपूर येथून वाहनाने ही मूर्ती शुक्रवारी पहाटे ४ वाजता हिंगोलीत आणण्यात आली आहे. हिंगोली शहरात आल्यानंतर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तीचे विधिवत पूजन केले. सुमारे चार फूट उंचीची असलेली अष्टधातूची मूर्ती ८५ किलो वजनाची आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हिंगोली शहरात मूर्ती स्थापना केली आहे. दहा दिवसांनी मूर्तीचे प्रतीकात्मक विसर्जन करून ही मूर्ती संस्थानला दिली जाणार असल्याचे नगरसेवक अशोक नाईक यांनी सांगितले.

फोटो :

Web Title: Ashtadhatu idol filed in Hingoli