लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे कंपनीच्या मालाची नक्कल करून तो माल पुरवठा करून एका विकणाºया नांदेडच्या विक्रेत्याविरूद्ध कॉपीराईट अॅक्टचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.नांदेड येथील आरोपी शेख गफूर शेख हफीज हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या बनावट कंपनीच्या विविध वस्तू विकत होता. कुरूंदा बाजारपेठेमध्ये २६ नोव्हेंबर रोजी ६.३० वाजता विकताना तो आढळून आला. बनावट कंपनीचे आॅलमिन ड्रॉप आईल, पाऊच, कंपनीचे जास्तीत आईल, आणखी एका नामवंत कंपनीची तेल बाटली व पाऊच असा एकूण ११३९ रुपयाचा बनावट साठा त्याच्याकडे आढळला. अधिकृत कंपनीच्या अधिकाºयांनी रंगेहाथ बनावट माल पोलिसांना पकडून दिला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. फिर्यादी अब्दुल अजीम अब्दुल मन्नान (आय.पी. इन्न्व्हेस्टिगेशन अॅन्ड डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई) यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी शेख गफूर शेख हफीज (रा. नांदेड) याच्याविरूद्ध कलम ५१,६३, कॉपी राईट अॅक्ट सन १९५७ च्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोउपनि शंकर इंगोले हे करीत आहेत.
बनावट वस्तू विकणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:08 IST