पोत्रा येथे मतदान केंद्राध्यक्षांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:57+5:302021-01-16T04:34:57+5:30

कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाॅर्ड क्रमांक एकमध्ये तीन जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी सात वाजल्यापासून ...

Arbitrariness of polling station president at Potra | पोत्रा येथे मतदान केंद्राध्यक्षांची मनमानी

पोत्रा येथे मतदान केंद्राध्यक्षांची मनमानी

कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाॅर्ड क्रमांक एकमध्ये तीन जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी सात वाजल्यापासून याठिकाणी मतदानास सुरुवात झाली; मात्र येथील मतदान केंद्राध्यक्ष यांनी उमेदवारांना आतमध्ये येण्यास प्रतिबंध घातल्याने उमेदवारांसह गावात संतापाची लाट उसळली आहे. दुपारी ४-३०वाजेनंतर संबंधित झोनल ऑफिसर आल्यानंतर सर्व उमेदवारांनी झोनल ऑफिसर (क्षेत्रीय अधिकारी) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर उमेदवारांना आतमध्ये प्रवेश मिळाला, तर पोत्रा येथील संजय शामराव चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी नाही, असे असताना मतदान केंद्राध्यक्ष यांनी तुमचे नाव टपाली मतदानामध्ये आहे म्हणून मतदान करण्यात मज्जाव केला, त्यानंतर गावातील कार्यकर्त्यांनी कळमनुरीचे तहसीलदार यांना मोबाइलवरून याविषयी माहिती दिली असता त्यांनी मतदान यादीची मूळ प्रत पाठवून संबंधितांना मतदान करण्याचे आदेश दिले.

Web Title: Arbitrariness of polling station president at Potra