वसमत, कुरुंदा येथील गोदाम बांधकामास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST2021-02-21T04:55:41+5:302021-02-21T04:55:41+5:30
वसमत तालुक्यातील कुरुंदा व वसमत येथे गोदाम बांधकाम करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने शासनाकडे अंदाजपत्रक ...

वसमत, कुरुंदा येथील गोदाम बांधकामास मंजुरी
वसमत तालुक्यातील कुरुंदा व वसमत येथे गोदाम बांधकाम करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने शासनाकडे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानुसार कुरुंदा व वसमत येथे प्रत्येकी १०८० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी औरंगाबाद येथील मुख्य अभियंता यांनी ७२३.०८ लाख रुपयांच्या निधी खर्चास मान्यता दिली आहे. यामध्ये ३५८.३८ लाख रुपयांचा निधी कुरुंदा येथील गोदाम बांधकामास, तर ३६४.७० लाख रुपयांचा निधी वसमत येथील गोदाम बांधकामास दिला जाणार आहे. नवीन शासकीय गोदाम बांधकामासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर बांधकाम तातडीने सुरू करून विहीत मुदतीत पूर्ण करावे लागणार आहे. तसेच काम सुरू करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबत पूर्तता करून घ्यावी लागणार आहे. गोदामाचे बांधकाम प्रगतिपथावर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना कमीत कमी तीन वेळेस भेट देऊन कामाची गुणवत्ता तपासावी लागणार आहे. याबाबतचा शासन निर्णय अव्वर सचिव दी. नि. केंद्रे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.