वसमतच्या १४ खासगी डॉक्टरांना कोविड सेंटरमध्ये नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:42+5:302021-04-18T04:28:42+5:30
यामध्ये डॉ. क्यातमवार, डॉ. दिवसे, डॉ. सेलूकर, डॉ. चेतन सातपुते, डॉ. मयूर सातपुते, डॉ. प्रशांत खराटे, डॉ. कऱ्हाळे, डॉ. ...

वसमतच्या १४ खासगी डॉक्टरांना कोविड सेंटरमध्ये नियुक्ती
यामध्ये डॉ. क्यातमवार, डॉ. दिवसे, डॉ. सेलूकर, डॉ. चेतन सातपुते, डॉ. मयूर सातपुते, डॉ. प्रशांत खराटे, डॉ. कऱ्हाळे, डॉ. युवराज बेंडे, डॉ. सतीश कोंडावार, डॉ. वाघमारे, डॉ. मोरे, डॉ. सोमाणी, डॉ. मार्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत ही नियुक्ती राहणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर वाढतच चालला असून त्या तुलनेत आता यंत्रणा वाढविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. कोरोनाशी मुकाबला करीत असतानाच हे सर्व करायचे आहे. त्यातच नवीन यंत्रणा उभारण्यासाठी निधीसह मनुष्यबळ अशा इतर अडचणींचाही सामना करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात नागरिकांनी कोरोनापासून बचावासाठी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडल्यास सध्याच इंजेक्श्न, ऑक्सिजन, खाटांची उपलब्धता अशा अनेक बाबींसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कळमनुरीतही अडचण
वसमतप्रमाणेच कळमनुरीतही डॉक्टरांची अडचण आहे. आहे त्या मनुष्यबळावर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे कळमनुरीतही वसमतप्रमाणे काही उपाययोजना केल्या तर या रुग्णालयाची आणखी क्षमताही वाढविणे शक्य आहे. शिवाय वसमत येथेही फक्त ५० ऑक्सिजन बेड असून त्यातही वाढ करण्याचा उपाय प्रशासनाने हाती घेतला तर या ठिकाणी अधिकची सोय उपलब्ध होणार आहे. सध्या वसमतमधील गंभीर रुग्ण कळमनुरी, सिद्धेश्वर येथे हलविण्याची वेळ येत आहे.