कायदा, सुव्यवस्थेसाठी १३ दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:44+5:302021-09-10T04:36:44+5:30
१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत उद्भवणारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यात १३ पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी एक ...

कायदा, सुव्यवस्थेसाठी १३ दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत उद्भवणारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यात १३ पोलीस ठाण्यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १३ विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वसमत येथील शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, हट्टा पोलीस ठाणे वसमत तहसीलदार अरविंद बोळगे, कुरुंदा पोलीस ठाणे नायब तहसीलदार पळसकर, वसमत, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, नर्सी नामदेव पोलीस ठाणे तहसीलदार संदीप राजपुरे, बासंबा पोलीस ठाणे नायब तहसीलदार राजेंद्र गळगे, कळमनुरी पोलीस ठाणे तहसीलदार एस. सी. पाचपुते, बाळापूर पोलीस ठाणे नायब तहसीलदार पाठक, औंढा नागनाथ पोलीस ठाणे नायब तहसीलदार सचिन जोशी, सेनगाव पोलीस ठाणे तहसीलदार यू. आर. बोथीकर, गोरेगाव पोलीस ठाणे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस ठाण्याशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे, तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या पोलीस ठाण्याशिवाय तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे, असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेशात नमूद केले आहे.