कृषीपंप ग्राहकांना वीज देयके भरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:32+5:302021-02-14T04:27:32+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील ७५ हजार २५९ कृषीपंप ग्राहकाकडे सप्टेंबर २०२० अखेर चालू वर्षाचे वीज देयक रुपये ३१३३.५५ लक्ष एवढी ...

Appeal to agricultural pump customers to pay electricity bills | कृषीपंप ग्राहकांना वीज देयके भरण्याचे आवाहन

कृषीपंप ग्राहकांना वीज देयके भरण्याचे आवाहन

हिंगोली : जिल्ह्यातील ७५ हजार २५९ कृषीपंप ग्राहकाकडे सप्टेंबर २०२० अखेर चालू वर्षाचे वीज देयक रुपये ३१३३.५५ लक्ष एवढी आहे. त्यापैकी औंढा ना. तालुक्यातील १२२५८ ग्राहकांकडे ५४७.०६ लक्ष रुपये, वसमत तालुक्यातील २१ हजार ६८१ ग्राहकांकडे ९६६.५२ लक्ष, हिंगोली तालुक्यातील १२ हजार ४२५ ग्राहकांकडे ४४५.८३ लक्ष, कळमनुरी तालुक्यातील १४ हजार ०५२ ग्राहकांकडे ५१२.१२ लक्ष आणि सेनगाव तालुक्यातील १४८४३ ग्राहकांकडे ६६२.०२ लक्ष चालू वर्षाचे देयक थकीत आहेत. सर्व कृषीपंप ग्राहकांना सुचित करण्यात आले आहे की, चालू वर्षाचे वीज देयकाचा भरणा करुन महावितरण कंपनीस सहकार्य करावे. यानंतर कृषीपंप ग्राहकाने चालू वर्षाचे वीज देयकाचा भरणा न केल्यास त्यांचा तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा खंडीत करण्याची धडक मोहीम तालुका निहाय सुरू आहे. यासाठी कृषीपंप ग्राहकांनी आपले आपले थकीत वीजदेयके भरावीत असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

Web Title: Appeal to agricultural pump customers to pay electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.