शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वसमत-मालेगाव मार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:10 IST

कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात वाढल्याचा नागरिकांचा आरोप

वसमत (जि. हिंगोली): नांदेड येथून परभणीकडे निघालेल्या दुचाकीचा कन्हेरगाव फाट्याजवळील एका हॉटेल जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवार रोजी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही घटना रविवार रोजी रात्री घडली आहे.

वसमत-मालेगाव मार्गावरील कन्हेरगाव फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेल जवळ २६ जानेवारी रोजी रात्री ९ वा नांदेड येथुन परभणीकडे जाणाऱ्या दुचाकीचा ( क्र एम एच २६ सीएल १३२०) अपघात झाला. यात दुचाकीवरील नरेंद्र राजकुमार दिक्षित ( वय २४,रा परभणी) , सुमित साहेबराव जोगदंड ( वय २५,रा गोकुळ नगर नांदेड) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दोघांची तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात वाढले....वसमत-मालेगाव मार्गाचे काम गत पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. मार्गावरील उघडी नदी पुलाचे काम सुरू आहे. जो रस्ता झाला त्या रस्त्यावर रबर स्टक अद्याप बसवण्यात आलेले नाही. तसेच मार्गावर दिशादर्शक कुठेच नाहीत. यापुर्वीही याच ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला होता‌. त्यानंतर ही राष्ट्रीय महामार्ग विभाग व कंत्राटदार यांनी दक्षता घेतली नसल्याचे चित्र आहे. कंत्राटदाराच्या चुकीमुळे अपघात वाढले असल्याचा आरोप करत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली