अण्णाभाऊंनी साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:11+5:302021-02-05T07:53:11+5:30
हिंगोली : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य मुळात वंचितांना समानतेच्या प्रवाहात ...

अण्णाभाऊंनी साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले
हिंगोली : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामधून राष्ट्रनिर्मितीचे विचार मांडले आहेत. त्यांचे साहित्य मुळात वंचितांना समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी होते, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केले.
लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित हिंगोलीतील क्रांतिवीर लहुजी साळवे स्मृती अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत ते बोलत होते. उद्घाटन लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे यांनी केले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायाधीश पी. ए. खिल्लारे होते. यावेळी विचार मंचावर अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुसुम गोपले, डॉ. अमोल धुमाळ, उपकोषागार अधिकारी दीपक गवलवाड, प्राचार्य डॉ. डोरनलपल्ले, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शहरातील महावीर भवन येथे झालेल्या व्याख्यान कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आत्माराम गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अनिल खंदारे यांनी केले, तर आभार एस. एस. मंडलिक यांनी मानले. यशस्वितेसाठी लसाकमचे हिंगोली उपाध्यक्ष हरिभाऊ सोनवणे, कमलाकर मानवतकर, सहकार्याध्यक्ष रामानंद आठवले, श्रावण मंडलिक, सहसचिव व्ही. एन. उबाळे, कोषाध्यक्ष रवींद्र खंदारे, एन. आर. खंदारे, एम. एन. सूर्यवंशी, डी. पी. गायकवाड, डी. पी. खरात, एन. पी. आठवले, एस. एस. गवळी, एन. एन. शिखरे, आर. के. वैरागड, आर. के. कांबळे आदींनी पुढाकार घेतला.
फोटो नं. १५