आंध्र, गुजरातचा दशहरी आंबा हिंगोलीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST2021-04-15T04:28:41+5:302021-04-15T04:28:41+5:30

शहरातील गांधी चौक, खटकाळी बायपास, जवाहर रोड, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर, नांदेड नाका, औंढा रोड, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी ...

Andhra, Gujarat's Dussehra Mango filed in Hingoli | आंध्र, गुजरातचा दशहरी आंबा हिंगोलीत दाखल

आंध्र, गुजरातचा दशहरी आंबा हिंगोलीत दाखल

शहरातील गांधी चौक, खटकाळी बायपास, जवाहर रोड, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर, नांदेड नाका, औंढा रोड, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांत फळे विक्रेत्यांनी हातगाडे उभे केल्याचे पाहायला मिळत आहे. गत पंधरा दिवसांपासून दशहरी, बादाम आणि लंगडा आंबा शहरात दाखल झाला आहे.

कोरोना महामारीमुळे होतेय उपासमार

शहरात जवळपास आठ ते दहा आंबा विक्रेते आहेत. पूर्वापार हाच व्यावसाय असल्यामुळे इतर व्यवसाय करणे शक्य होत नाही. कोरोनामुळे व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये कोरोनाआधी पदरात पडायचे; परंतु सद्य:स्थितीत वाईट वेळ फळ विक्रेत्यांवर येऊन ठेपली आहे. जिल्हा प्रशासनाने फळे विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा देऊन कोरोना काळात अन्नधान्याची व्यवस्था करावी.

-शेख नईम बागवान, हिंगोली

फोटो नंबर ३४

Web Title: Andhra, Gujarat's Dussehra Mango filed in Hingoli