शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पतीस उपचारासाठी नेताना रुग्णवाहिकेचा अपघात; पती - पत्नीचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 10:21 IST

आंबा चौंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रक अपघातात दोन ठार; ६ गंभीर जखमी

- इस्माईल जहागिरदारवसमत: औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री रुग्णवाहिका व ट्रकच्या भीषण आपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालकासह ६ जण गंभीर जख्मी झाले आहेत.

हिंगोली तालुक्यातील राहुली बु.येथील राघोजी मारोती डोरले यांना नांदेड येथे उपचारासाठी रुग्णवाहिका (जी टी १८ बी टी ४७७३ ) मध्ये नातेवाईक घेऊन जात होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री वसमत औंढा नागनाथ मार्गावरील आंबा चौंडी फाट्याजवळ रुग्णवाहिका व ट्रक ( क्र एम एच २६ ऐडी ७२७२ ) चा भीषण अपघात झाला. या आपघातात कलावती राघोजी डोरले (वय ४५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नांदेड येथे उपचारादरम्यान राघोजी मारोती डोरले ( ५१) यांचा आज रोजी पहाटे मृत्यू झाला. दोघे मृत पती पत्नी होते.

अपघातात रूग्णवाहिका चालक अक्षय साळवे रा वसई, तानाजी राघोजी डोरले वय २६, नागोराव बळीराम डोरले २२, गणेश संतोष शिंदे वय १८, सचिन नामदेव डोरले वय २४, सर्व रा राहुली बु., मुंजाजी आनंदराव मोधे वय ३६,रा फुलधाबा ता औढा हे सर्वजण गंभीर जखमी जख्ले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन मोरे,  तुकाराम आम्ले, संतोष पटवे, बालाजी जोगदंड, गजानन भोपे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे नांदेड येथे रवाना केले. पतीस नांदेड येथे उपचारासाठी नेतांना पतीपत्नीचा मृत्यू झाल्याने राहुली बु.गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघातDeathमृत्यू