दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:11+5:302021-04-08T04:30:11+5:30

मार्च महिन्यात दोनवेळा सात दिवसाची संचारबंदी लागू केली होती. यामध्ये व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य केले. शासनाने लॉकडाऊन ...

Allow shops to open | दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

मार्च महिन्यात दोनवेळा सात दिवसाची संचारबंदी लागू केली होती. यामध्ये व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य केले. शासनाने लॉकडाऊन लावले तरी जिल्ह्यात व्यापाऱ्यांना थोडी सूट दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र लगेच ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करीत लॉकडाऊनला विरोध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊन आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे.

या निवेदनावर अध्यक्ष माजी आ. गजानन घुगे, रमेशचंद बगडिया, सुदर्शन कंदी, प्रकाशचंद सोनी, सुनील देवडा, सुनिता मुळे सुधीरअप्पा सराफ, आनंद निलावार, मुरलीधर हेडा, पंकज अग्रवाल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Allow shops to open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.