लसीकरणासाठी कल्याण मंडपममध्ये अलाेट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:58+5:302021-09-02T05:03:58+5:30

हिंगोली : शहरातील तीन लसीकरण केंद्रांपैकी दोन दोन केंद्र बंद केल्यामुळे कल्याण मंडपम येथे बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला ...

Allot crowd in Kalyan Mandapam for vaccination | लसीकरणासाठी कल्याण मंडपममध्ये अलाेट गर्दी

लसीकरणासाठी कल्याण मंडपममध्ये अलाेट गर्दी

हिंगोली : शहरातील तीन लसीकरण केंद्रांपैकी दोन दोन केंद्र बंद केल्यामुळे कल्याण मंडपम येथे बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. दुसरीकडे कोरोना नियमांचा या ठिकाणी फज्जा उडाल्याचे दिसून आले.

सुरुवातीला कोरोना लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डीआयसी येथे एकच केंद्र होते. येथे लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे शहरात दुसरे दोन केंद्र उघडण्यात आले होते. परंतु, कोरोनाकाळात कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केल्याने केंद्रावर बसण्यासाठी कोणीच नाही. त्यामुळे माणिक स्मारक विद्यालय व सरजू देवी विद्यालय ही दोन्ही लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाने घेतला आहे. परिणामी कल्याण मंडपम् येथे १ सप्टेंबर रोजी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोना नियमांमुळे कोणाचेही लक्ष नव्हते. ना कोणाला मास्क, ना सामाजिक अंतर असेच चित्र कल्याण मंडपम येथे पहायला मिळाले.

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे..

१६ जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यासाठी चार लाख ४५ हजार ४० दोन्ही लसींचे डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी आतापर्यंत दोन्ही डोस मिळून तीन लाख ७६ हजार ३१८ लसीचे डोस नागरिकांना दिले आहेत. सद्य:स्थितीत ५६ हजार लस जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे. तिसरी लाट लक्षात घेऊन नागरिकांनी वेळात वेळ काढून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

-डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

फ्रंट लाइन वर्कर

पहिला डोस १३,५६३

दुसरा डोस ५,९०८

हेल्थकेअर वर्कर्स

पहिला डोस ७१६०

दुसरा डोस ५१००

१८ ते ४५

१,२५,९४८

दुसरा डोस १५,४५२

४५ ते ६०

पहिला डोस ७५,३०३

दुसरा डोस ३४,६४९

६० वर्षांवरील

पहिला डोस ६७,८७८

दुसरा डोस २५, ३६६

फाेटाे आहे.

Web Title: Allot crowd in Kalyan Mandapam for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.