कळमनुरी विधानसभेची राजकीय दिशा ठरवणारी आखाडा बाळापूरची सर्वात मोठी ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:27+5:302020-12-29T04:28:27+5:30
आखाडा बाळापूर : ही ग्रामपंचायत कळमनुरी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. कळमनुरी विधानसभेची राजकीय दिशा ठरवणारी आणि विधानसभेचा राजकीय ...

कळमनुरी विधानसभेची राजकीय दिशा ठरवणारी आखाडा बाळापूरची सर्वात मोठी ग्रामपंचायत
आखाडा बाळापूर : ही ग्रामपंचायत कळमनुरी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. कळमनुरी विधानसभेची राजकीय दिशा ठरवणारी आणि विधानसभेचा राजकीय केंद्रबिंदू असलेली ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे.
आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण १० हजार ५०३ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ५,४९९, तर स्त्री मतदार ५,४०० एवढे आहेत. एकूण ६ प्रभागांमधून १७ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान होऊ घातले आहे. परिसरातील ९० गावांच्या व्यापारपेठेचे केंद्रबिंदू असलेली सर्वात मोठी व्यापारपेठ आहे. बाळापूर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने झटून प्रयत्न होतात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी पंधरा वर्षांपासून येथील ग्रामपंचायतीची सत्ता एकहाती राखलेली आहे. येथे वर्चस्व प्राप्त करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अनेकदा मुकाबला केला जातो. शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य अशा सर्व स्तरावरचे सत्तापदे देण्यात आली आहेत.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील ही महत्त्वाची ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राजकीय केंद्रबिंदू असलेली ही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये येत्या काही काळात घमासान पाहायला मिळेल.