शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ

By रमेश वाबळे | Updated: September 25, 2022 21:45 IST

या दसरा महोत्सवाचे यंदा १६८ वे वर्ष आहे.

हिंगोली : शहरातील जलेश्वर मंदिरात २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या आकाशवाणी कार्यक्रमाने ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ झाला. या दसरा महोत्सवाचे यंदा १६८ वे वर्ष आहे, तर २६ सप्टेंबरपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने येथील रामलीला मैदानावर दसरानिमित्त कृषी प्रदर्शनी, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी येथील जलेश्वर मंदिरात आकाशवाणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाने दसरा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.

यावेळी दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सचिव तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, ॲड. किरण नर्सीकर, राजेंद्र हलवाई, विश्वास नायक, गणेश साहू, पिंटू टाले, बगडीया, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४वाजता रामलीला मैदानावर कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर श्री.हनुमान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDasaraदसरा