पुन्हा कोरोनाचे ६७ रुग्ण, २८ जण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:07+5:302021-03-14T04:27:07+5:30
हिंगोली जिल्ह्यात आज अँटीजन तपासणीत हिंगोलीत १३६ पैकी ७ बाधित आढळले. यात सुराणानगर १, डोंगरकडा १, ागपूर १, मुदखेड ...

पुन्हा कोरोनाचे ६७ रुग्ण, २८ जण बरे
हिंगोली जिल्ह्यात आज अँटीजन तपासणीत हिंगोलीत १३६ पैकी ७ बाधित आढळले. यात सुराणानगर १, डोंगरकडा १, ागपूर १, मुदखेड १, वाघझरी १, रिसाला बाजार २ या सात जणांचा समावेश आहे. कळमनुरीत ११३ पैकी ८ बाधित आढळले. यात लोणधरी ता.पुसद ३, कोथळज १, आखाडा बाळापूर २, जटाळवाडी १, डोंगरगाव नाका १ यांचा समावेश आहे. तर सेनगाव ३६, औंढा २३ व वसमतला ६५ चाचण्यांअंती एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरातील तब्बल ४२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात खुशालनगर २, जवळा बु. १, लाला लजपतरायनगर १, बासंबा १, गाडीपुरा १, अंबिकानगर १, बियाणीनगर १, एनटीसी २, नांदुरा २, येडूद १, रिसाला बाजार २, भट्ट कॉलनी १, तलाब कट्टा १, जिजामातानगर २, श्रीनगर १, वैजापूर २, यशवंतनगर ८, सरस्वतीनगर २, अंतुलेनगर २, रामाकृष्णानगर ५, घोटादेवी १, पोस्ट ऑफिस रोड २ यांचा समावेश आहे. वसमत शहरात दोन तर अकोलीत १ रुग्ण आढळला. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी १, कळमनुरी तालुक्यातील येळेगाव २, औंढा तालुक्यातील जवळा बाजार २, पिंपळा १, औंढा १ असे रुग्ण आढळून आले आहेत.
आज बरे झालेल्या २१ जणांना हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले. यात शास्त्रीनगर २, अंतुलेनगर १, सरस्वतीनगर २, आदर्श कॉलनी १, मारवाडी गल्ली १, जिजामातानगर ३, पानकनेरगाव १, पुसेनगाव १, खांबाळा १, रामाकृष्णानगर १, आदर्श कॉलनी १, बियाणीनगर १, पोस्ट ऑफिस रोड १, वंजारवाडा १, गंगानगर १, जिजामातानगर १, हिंगोली १ यांचा समावेश आहे. लिंबाळा येथून सुराणानगर १, अंतरगाव १ या दोघांना तर कळमनुरीतून विद्यानगर ३, माळधामणी १, जामगव्हाण १ अशा पाच जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत एकूण ४७१२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यापैकी ४१७७ जण बरे झाल्याने यांना घरी सोडले. सध्या ४७० जणांवर उपचार सुरू आहेत. आज्पर्यंत कोरोनाने ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी २२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले असून तीन जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.