शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्र्यांनी धपाटे आणि आंबे खाऊन काढली गोशाळेत रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:13 IST

एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.

हिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे हे गुरुवार (दि.९ ) पासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यानंतर सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील गोशाळेत त्यांनी रात्री मुक्काम केला. शेतकऱ्यांशी संवाद साधून विविध अडचणी जाणून घेतल्या. गोशाळेत जेवणाची व्यवस्था नसल्याने एका कार्यकर्त्याने आणलेले धपाटे व आंबे खाऊन त्यांनी रात्र काढली.

पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द, रामवाडी, उमरा या गावांना भेटी दिल्या. तसेच सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक या दुर्गम भागात जाऊन त्यांनी गोशाळेत मुक्काम केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणी प्रश्न, रोहयो, चारा छावण्या आदी समस्यांवर तातडीने उपाययोजना करू असे  आश्वासन दिले. 

आमच्या वेदना समजून घ्या म्हणत विद्यार्थिनींनी दिला पालकमंत्र्यांच्या डोक्यावर हंडा

भविष्यात चारा प्रश्न गंभीर होण्याचे चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यास तातडीने चारा छावण्या सुरु केल्या जातील. काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने तेथे फिल्टरचे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असून याबाबत प्रशासनाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतमजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोहयोची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक गावातून किमान दहा कामे सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये मागेल त्या गावाला टँकर तसेच टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शेतकरी, पशुपालक व नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळDilip Kambleदिलीप कांबळेHingoliहिंगोली