दीड दशकानंतर जिल्हा रुग्णालयात भरली १६ परिसेविकांची पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:33 IST2021-08-12T04:33:45+5:302021-08-12T04:33:45+5:30
हिंगोली : गत एक ते दीड दशकांनंतर जिल्हा रुग्णालयातील परिसेविकांची १६ पदे भरली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील जवळपास ...

दीड दशकानंतर जिल्हा रुग्णालयात भरली १६ परिसेविकांची पदे
हिंगोली : गत एक ते दीड दशकांनंतर जिल्हा रुग्णालयातील परिसेविकांची १६ पदे भरली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील जवळपास दहा ते बारा विभागांना आधार मिळाला असून, आता रुग्णांच्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील जवळपास दहा ते बारा विभागांचा कारभार हा दोनचं परिसेविकांवर चालत होता. त्यामुळे रुग्णांसह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच डाॅक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. जिल्हा रुग्णालयात परिसेविकांची एकूण १८ पदे मंजूर आहेत. पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे अनेकवेळा जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पाठपुरावाही करण्यात आला होता. परंतु कोरोना महामारीमुळे ही पदे भरण्यात आली नव्हती. १५ दिवसांपूर्वी परिसेविकांची १६ पदे भरली गेली आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागांना चांगलाच आधार मिळाला असून, रुग्णांच्या अडचणी सुटणार आहेत.
जिल्हा रुगणालयातील ओपीडी, आयपीडी, एक्स-रे विभाग, प्रसूती विभाग, पुरुष व स्त्री विभाग, कोविड विभाग, डायलेशीस विभाग असे जवळपास १० ते १२ विभाग आहेत. परंतु मागील दीड दशकांपासून दोनच परिसेविकांवर जिल्हा रुग्णालयाचा कारभार चालत होता. त्यामुळे अनेक अडचणीत भर पडली गेली होती.
पदे भरण्यासाठी केला पाठपुरावा...
जिल्हा रुग्णालयात १८ पदे परिसेविकांची मंजूर आहेत. परंतु, कित्येक वर्षापासून दोन परिसेविकांवर कामकाज चालत असे. १६ पदे लवकर भरावीत यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पंधरा दिवसांपूर्वी शासनाने जिल्हा रुग्णालयातील १६ पदे भरली आहेत.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक
फाेटाे नं. १५