प्रशासनाच्या जनजागृतीने वाढली मतदानाची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:35+5:302021-02-05T07:53:35+5:30

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

The administration's public awareness increased the turnout | प्रशासनाच्या जनजागृतीने वाढली मतदानाची टक्केवारी

प्रशासनाच्या जनजागृतीने वाढली मतदानाची टक्केवारी

हिंगोली : लोकसभा व विधानसभेच्या तुलनेत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात जनजागृती अभियान राबविले होते. त्यामुळेच मतदार घराच्या बाहेर पडला. ग्रामपंचायत निवडणुकीत तर विक्रमी मतदान झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.

राज्य घटनेने प्रत्येकाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. कोणाचे सरकार स्थापन करायचे वा कोणाचे पाडायचे, याची ताकद मतदारांमध्ये असते. मात्र, मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये अनुत्सुकता दिसून येते. मतदानासाठी दिलेल्या सुटीच्या दिवशी अनेकजण सहलीचे आयोजन करत कुटुंबीयांसमवेत वेळ घालवितात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जनजागृती करत मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनानेही मतदान जनजागृती करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या होत्या. त्यामुळेच २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केेवारी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या मतदार संघातील टक्केवारी काहीशी घसरली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती करण्यासाठी पथके कामाला लावली होती. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढली होती. यात आखणी वाढ होत २०२०मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान झाले आहे.

लोकसभेसाठी मतदान

२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सरासरी ६६.५२ टक्के मतदान झाले होते. यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या तीन मतदार संघामध्ये सरासरी ६४.८१ टक्के मतदान झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत वसमत ६९.६३, कळमनुरी ६७.२१, हिंगोली मतदार संघात ६२.७६ टक्के मतदान झाले. या तीन मतदार संघातील मतदानाची सरासरी टक्केवारी ६६.५३ होती. २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वसमत ६८.०७, कळमनुरी ६५.६४, हिंगोली ६०.७३ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढली असली तरी वसमत, कळमनुरी व हिंगोली या मतदार संघातील टक्केवारी घसरली होती.

विधानसभेसाठी मतदान

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, हिंगोली या मतदार संघाची टक्केवारी पाहिल्यास ६४.८१ होती. मात्र, प्रशासनाने जनजागृती केल्याने २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६८.७२ टक्के मतदान झाले. यात वसमत ७४.०३, हिंगोली ६३.६३, कळमनुरी ६८.८६ टक्के मतदानाचा समावेश आहे.

ग्रामपंचायतीसाठी मतदान

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदान वाढल्याचे पाहावयास मिळाले. तसेच ग्रामपंचायतीमध्ये आणखी टक्केवारी वाढली असून, सरासारी ८२ टक्के असे विक्रमी मतदान झाले. यात हिंगोली तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी ८२.५, सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींसाठी ८०.५, औंढा नागनाथ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींसाठी ८१.४१, कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी ८०.१४, वसमत तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले आहे. विधानसभेच्या तुलनेत यात विक्रमी मतदान झाले आहे.

२०्र१४

लोकसभा

३४/६६

२०१९

विधानसभा

३२/६८

२०२०

ग्रामपंचायत

८२

Web Title: The administration's public awareness increased the turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.