शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पोलीस भरती घोटाळा प्रकरणी सेवानिवृत्त समादेशक नामदेव मिठ्ठेवाड अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 21:53 IST

मिठ्ठेवाड यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

हिंगोली :  राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती घोटाळ्यात तत्कालीन समादेशक आणि हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्र. १२ च्या पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आले होते. त्यानंतर ११ मे २०१८ रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम पुष्ठपाटे, सूत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस. एस. जी. सॉफ्टवेअर कंपनीचे ऑपरेटर शिरीष औधूत, पोलीस कर्मचारी शेख महेबूब शेख आगा आणि गुण वाढवून नोकरी मिळविणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदणे यांच्या पथकाकडे होता. २०१३ साली ४, २०१४ मध्ये १०, तर २०१७ मध्ये ६, अशा एकूण २० जणांचे गुण वाढवून त्यांची एसआरपीएफमध्ये भरती केल्याचा आरोप होता. दरम्यान, तपास अधिकारी राहुल मदने यांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक व माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना आज बोलावले होते. अर्थपूर्ण देवाणघेवाणीतूनच ही भरती झाल्याचे चौकशीत समोर आले. उत्तर पत्रिका व संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर मदने यांनी मिठ्ठेवाड यांना अटक केली. यानंतर सायंकाळी ५ वाजता हिंगोली येथील न्यायालयासमोर मिठ्ठेवाड यांना हजर केल्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले. यात आरोपींची संख्या जवळपास तीसच्या घरात गेली आहे. मिठ्ठेवाड यांना अटक होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र आज अटकेची कारवाई करताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. 

टॅग्स :PoliceपोलिसfraudधोकेबाजीHingoliहिंगोली